
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi Awards 2026: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असलेला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६ नुकताच पार पडला. यावेळी दिमाखदार रेड कार्पेट एन्ट्री, लाडक्या जोड्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स, खलनायकांचे हटके अंदाज आणि अनेक अनपेक्षित सरप्राइजेस पाहायला मिळाले.मराठी मनोरंजनविश्वातील अनेक ज्येष्ठ कलाकारांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली. ‘झी मरठी’ पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘सनई चौघडे’ या मालिकेने बाजी मारत सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकल्याचं पाहायला मिळालं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कलाकारांच्या आकर्षक लूकपासून त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सपर्यंत अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. लाडक्या जोड्यांच्या नृत्याविष्कारांनी सोहळ्यात रंगत आणली, तर खलनायकांच्या हटके अंदाजानेही उपस्थितांचं मनोरंजन केलं.
केवळ मनोरंजनच नव्हे, तर आव्हानांवर मात करत यश मिळवणाऱ्या कलाकारांच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा गौरवही या सोहळ्यात करण्यात आला. नात्यांमधील गोडवा, कलाकारांची धमाल आणि प्रेरणादायी क्षणांमुळे हा पुरस्कार सोहळा खास ठरला.
.
आता यावर्षी कोणकोणत्या कलाकरांनी पुरस्कार पटकावला आहेत ते जाणून घेऊयात..