Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi New Serial: उषा नाडकर्णी झी मराठीवर कमबॅक करणार; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका

Zee Marathi New Serial: झी मराठीवर ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवी कौटुंबिक मालिका सुरू होणार आहे. उषा नाडकर्णी ठकूबाईंच्या भूमिकेत, तर पूजा बिरारी शिवानीच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 03, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Zee Marathi New Serial: प्रेम, विश्वास आणि आपुलकीच्या जोरावर एखाद्या घरातील भीतीचं वातावरण बदलता येईल का? अन्याय आणि दहशतीच्या छायेत जगणाऱ्या कुटुंबात पुन्हा आनंद निर्माण करणं शक्य आहे का? याच प्रश्नांची उत्तरं शोधणारी नवी कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठी लवकरच ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. एका खंबीर सुनेची आणि संपूर्ण घरावर आपला दरारा निर्माण करणाऱ्या आजेसासूची ही अनोखी गोष्ट असणार आहे.

ठकूबाईंच्या शब्दापुढे संपूर्ण गाव झुकतं!

साताऱ्यातील टाकळवाडी गावात ठकूबाई थोरात यांचा मोठा दरारा आहे. सावकारीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण गावावर आपली पकड निर्माण केली आहे. घरातही त्यांचाच शब्द अंतिम मानला जातो. त्यांच्या भीतीमुळे कुटुंबातील सदस्य स्वतःचे विचार मांडण्यासही घाबरतात. अशा परिस्थितीत ठकूबाईंच्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं धाडस दाखवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे त्यांचा नातू अभिजीत.

मात्र, अभिजीतच्या आयुष्यात शिवानी आल्यावर या घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण होते.

Jay Jay Swami Samarth: सहा वर्षांचा भक्तिमय प्रवास, २००० भागांचा टप्पा पूर्ण; सुनील गोडसेंनी अक्कलकोटमध्ये घेतले स्वामींचे दर्शन!

शिवानी ठकूबाईंचं मन जिंकू शकेल?

शिवानी हुशार, आत्मविश्वासू आणि प्रेमळ स्वभावाची आहे. तिचा स्वभाव ठकूबाईंच्या अगदी विरुद्ध असला, तरी त्यांच्या दहशतीला न घाबरणारी शिवानीच त्यांना आव्हान देऊ शकते, असा अभिजीतला विश्वास आहे. त्यामुळेच तो शिवानीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो.

शिवानीसाठी या घरात येणं म्हणजे केवळ संसार थाटणं नाही. तर घरातील प्रत्येकाच्या मनात असलेली भीती दूर करून त्यांना स्वतःसाठी उभं राहण्याचा आत्मविश्वास देणं, हे तिचं ध्येय आहे. आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि सकारात्मक विचारांनी ती कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Tusshar Kapoor: तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन; ५ कोटींची खंडणी मागितल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

उषा नाडकर्णी पुन्हा झी मराठीवर

या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ठकूबाईंची भूमिका साकारणार आहेत. तर शिवानीच्या भूमिकेत पूजा बिरारी आणि अनिकेतच्या भूमिकेत हर्षद अतकरी दिसणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने पूजा बिरारी आणि हर्षद अतकरी हे दोघेही झी मराठीवर पदार्पण करणार आहेत.

ठकूबाईंसारख्या कणखर आणि हट्टी स्वभावाच्या व्यक्तीचं मन शिवानी जिंकू शकेल का? त्यांच्या कठोर वागण्यामागे दडलेल्या वेदना तिला समजून घेता येतील का? या घरातील भीतीची जागा प्रेम घेईल का? असे अनेक प्रश्न या मालिकेतून उलगडणार आहेत.

एका बाजूला ठकूबाईंचा दरारा, तर दुसऱ्या बाजूला शिवानीचा आत्मविश्वास आणि प्रेमळ स्वभाव, असा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवी मालिका लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Zee marathi new serial yetech aata mi nandayla usha nadkarni pooja birari ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Serial
  • pooja birari

संबंधित बातम्या

Dia Mirza: दिया मिर्झाच्या दिवाळीच्या व्हिडिओवरून वाद; मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला दिले महत्त्वाचे निर्देश!
1

Dia Mirza: दिया मिर्झाच्या दिवाळीच्या व्हिडिओवरून वाद; मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला दिले महत्त्वाचे निर्देश!

Chikizing Movie: ‘चला चला मामाच्या गावाला…’ म्हणत उपेंद्र लिमये घेऊन येणार बालपणीच्या आठवणींची सफर; ‘चिकीझिंग’चे गाणे रिलीज
2

Chikizing Movie: ‘चला चला मामाच्या गावाला…’ म्हणत उपेंद्र लिमये घेऊन येणार बालपणीच्या आठवणींची सफर; ‘चिकीझिंग’चे गाणे रिलीज

Amrapali Dubey: लग्नापेक्षा आता आई होण्याची ओढ? आम्रपाली दुबेच्या वक्तव्याने ‘बिग बॉस २०’मध्ये रंगली चर्चा
3

Amrapali Dubey: लग्नापेक्षा आता आई होण्याची ओढ? आम्रपाली दुबेच्या वक्तव्याने ‘बिग बॉस २०’मध्ये रंगली चर्चा

Tusshar Kapoor: तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन; ५ कोटींची खंडणी मागितल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू
4

Tusshar Kapoor: तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन; ५ कोटींची खंडणी मागितल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.