Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानचा थाटात पार पडला साखरपुडा; अभिनेत्याने सांगितली लव्ह स्टोरी

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानने तमन्नासोबत साखरपुडा केला. अभिनेत्याने मंगेतरसोबतचे फोटो शेअर करत लव्ह स्टोरीही सांगितली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 23, 2026 | 08:06 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता मोहसिन खान सध्या चर्चेत आहे. मोहसिनने नुकताच साखरपुडा केला असून त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्याने मंगेतर तमन्नासोबतचे काही खास फोटो पोस्ट करत तिचा चेहराही पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आणला आहे.

मोहसिनने तमन्नासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत तिच्यासाठी खास चिठ्ठी लिहिली. त्याने तमन्नाच्या स्वभावाचे कौतुक करत तिच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा आनंद व्यक्त केला. आपल्या भावनिक पोस्टमध्ये त्याने “मला माझा जीवनसाथी सापडला होता” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोहसिन-तमन्नाचा एंगेजमेंट लूक चर्चेत

साखरपुड्याच्या खास सोहळ्यात मोहसिन खान क्लासिक ब्लॅक टक्सीडोमध्ये डॅशिंग दिसत होता. पांढरा शर्ट, लाल टाय आणि त्याला मॅचिंग पॉकेट स्क्वेअर असा त्याचा लूक होता. तर तमन्नाने सिक्विन्स आणि आकर्षक कट असलेला लाल रंगाचा फ्लोअर-लेंथ गाऊन परिधान केला होता. मिनिमल ज्वेलरी आणि ग्लॅमरस मेकअपमुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत होता.

या दोघांनी साखरपुड्याच्या हिऱ्याच्या अंगठ्यांसोबतही फोटोसाठी पोझ दिली. तमन्नाच्या अंगठीतील मोठा हिरा विशेष चर्चेचा विषय ठरला. एका क्लोज-अप फोटोमध्ये तमन्ना कॅमेऱ्यासमोर आपली एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे, तर मोहसिन तिच्या शेजारी हसताना दिसतो.

 

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

‘मला माझा जीवनसाथी सापडला…’

तमन्नासाठी लिहिलेल्या आपल्या खास पोस्टमध्ये मोहसिनने त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. “जेव्हा आपण पहिल्यांदा एकमेकांना पाहिले, जेव्हा मी पहिल्यांदा तुझा हात धरला…” असे म्हणत त्याने त्या खास क्षणांना उजाळा दिला.

मोहसिनने पुढे सांगितले की, त्या क्षणी त्याला आपला जीवनसाथी सापडल्याची जाणीव झाली होती. त्याने त्यांच्या नात्याला नशिबाची साथ असल्याचेही म्हटले. प्रेम, मैत्री आणि आयुष्यभराच्या आठवणींसोबत हा नवा प्रवास सुरू करत असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

कोण आहे मोहसिन खानची मंगेतर तमन्ना?

मोहसिनच्या मंगेतर तमन्नाबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. ती नेमकं काय काम करते किंवा तिचा मनोरंजन क्षेत्राशी संबंध आहे का, याबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. सोशल मीडियावर ती @tammerrrrz या नावाने सक्रिय असल्याचे दिसते. तिच्या प्रोफाइलच्या बायोमध्ये “सर्व स्तुती परमेश्वरासाठी आहे” असे लिहिले आहे.

मोहसिन आणि तमन्नाच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी या नव्या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

Web Title: Mohsin khan engagement yeh rishta kya kehlata hai actor reveals love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Actor
  • Engagement
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
1

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट
2

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण
3

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा
4

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.