Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेप्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! अखेर ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा आला; ‘या’ OTT वर पाहता येणार चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित 'खालिद के शिवाजी' हा मराठी चित्रपट आता Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies वर प्रदर्शित झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 14, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे.
  • या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा गोडवा आणि स्थानिक कलाकारांचा मोठा सहभागही पाहायला मिळतो.
  • संपूर्ण कुटुंबासह हा विचारप्रवर्तक चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना संवेदनशील कथानकातून मांडणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर हा चित्रपट Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. पी.पी. सिनेप्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून, लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झाली बिझनेसवुमन! अभिनयासोबत आता हॉटेल इंडस्ट्रीतही नवी इनिंग

चित्रपटात खालिद या निरागस मुस्लिम मुलाची कथा आहे. शाळेत त्याला ‘अफजलखान’ म्हणून चिडवले जात असल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत पोहोचतो आणि माणुसकी, समानता व सामाजिक सलोखा यांचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांनी सांगितले की, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून, त्यासाठी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आता चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत ओटीटीच्या माध्यमातून पोहोचत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील जात, धर्म, पंथ आणि भेदभावाच्या वास्तवावर एका लहान मुलाच्या नजरेतून भाष्य करत सकारात्मक बदलाचा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

निर्माते मायकल थेवर यांच्या मते, आजच्या काळात समाजाला जोडणाऱ्या कथा सांगण्याची गरज आहे. खालिदच्या निरागस प्रवासातून शिवाजी महाराजांच्या विचारांचा व्यापक अर्थ उलगडतो आणि धर्म-जात यांच्या पलीकडे माणुसकीच सर्वोच्च असल्याचा संदेश हा चित्रपट देतो. या चित्रपटाची प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Marché du Film, IFFI इंडियन पॅनोरामा 2025 तसेच अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील India Focus Special Screening साठी निवड झाली होती. विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा गोडवा आणि स्थानिक कलाकारांचा मोठा सहभागही पाहायला मिळतो.

Dhurandhar 2: भारतात ब्लॉकबस्टर, जपानमध्ये फुस्स! रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ला पहिल्याच दिवशी अवघे 900 प्रेक्षक

चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी चुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता तो Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies वर उपलब्ध असून, संपूर्ण कुटुंबासह हा विचारप्रवर्तक चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Web Title: Movie khalid ka shivaji was released on different ott platforms bookmyshow ott and youtube movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • OTT
  • OTT platform

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.