Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simulacra movie: आठवणी बदलल्या तर प्रेम टिकेल का? ‘सिम्युलाक्रा’मधून उलगडणार भविष्यकालीन प्रेमकथा

पंकज सावंत दिग्दर्शित 'सिम्युलाक्रा' या हाय-कॉन्सेप्ट साय-फाय चित्रपटात अक्षरा हासन आणि सत्यजीत दुबे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. न्यूरल मेमरी, AI आणि प्रेमाची अनोखी कथा सांगणारा हा चित्रपट १७ जुलैला Waves OTT वर प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 03:11 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

भारतीय मनोरंजनविश्वात विज्ञान, तंत्रज्ञान आणि भावनांचा अनोखा संगम घेऊन ‘सिम्युलाक्रा’ हा नवा फीचर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फिलोसिआ फिल्म्सने या बहुप्रतीक्षित चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून, हा चित्रपट १७ जुलै रोजी वेव्ह्ज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

निकटच्या भविष्यावर आधारित असलेल्या या साय-फाय थ्रिलरमध्ये मानवी जीवन न्यूरल ब्रेन चिप्सद्वारे नियंत्रित केले जाते. या जगात लोकांना त्यांच्या आठवणी बदलण्याची, पुन्हा लिहिण्याची किंवा पूर्णपणे पुसून टाकण्याची क्षमता मिळते. अशा भविष्यकालीन संकल्पनेवर आधारित ही कथा प्रेक्षकांना वास्तव आणि आभासी जगाच्या सीमारेषेवर घेऊन जाते.

चित्रपटात सत्यजीत दुबे ‘नयन’ आणि अक्षरा हासन ‘निवी’च्या भूमिकेत दिसणार आहेत. नयनचा दावा असतो की त्याचे आणि निवीचे पूर्वी अतिशय जवळचे नाते होते. त्यासाठी तो आपल्या न्यूरल मेमरी वॉल्टमधील छायाचित्रे पुरावा म्हणून दाखवतो. मात्र निवीच्या आठवणीत त्याचं अस्तित्वच नसतं. तिचं मेमरी वॉल्ट पूर्णपणे रिकामं असतं. त्यानंतर दोघे त्यांच्या भूतकाळाचा शोध घेत असताना प्रेम, आठवणी आणि सत्य याभोवती फिरणारा थरार उलगडत जातो.

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक पंकज सावंत म्हणाले, “आजच्या हायपर-रिअल जगात सत्य आणि भ्रम यातील फरक ओळखणं अधिकाधिक कठीण होत चाललं आहे. जर आपल्या आठवणींवरही विश्वास ठेवता आला नाही, तर सत्य शोधायचं कसं? ‘सिम्युलाक्रा’ ही केवळ तंत्रज्ञानाची कथा नाही, तर मानवी नातेसंबंध, प्रेम आणि वास्तवाच्या अर्थाचा शोध घेणारा चित्रपट आहे.”


Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’चा पहिला लूक प्रदर्शित; पोस्टरमध्ये लपली आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री; ओळखलंत का?

अभिनेत्री अक्षरा हासन म्हणाल्या, “निवी ही मी साकारलेल्या सर्वात वेगळ्या व्यक्तिरेखांपैकी एक आहे. या भूमिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून स्वतःची नवी बाजू शोधता आली. भावनांच्या अनेक छटा अनुभवण्याची संधी या चित्रपटाने दिली.”

तर अभिनेता सत्यजीत दुबे म्हणाला, “‘सिम्युलाक्रा’ची कथा मला सुरुवातीपासूनच आकर्षित करणारी होती. एआयच्या युगात वास्तव, ओळख आणि नातेसंबंध यांच्यातील धूसर होत चाललेल्या सीमांचा हा चित्रपट अत्यंत समर्पकपणे वेध घेतो.”

Marathi Serial : पहिल्या पावसात रंगणार केदार-तारिणीचा रोमँटिक क्षण, शिवानी सोनारने सांगितला शूटिंगचा खास किस्सा

जागतिक दर्जाच्या साय-फाय संकल्पनांना भारतीय भावविश्वाशी जोडणारा ‘सिम्युलाक्रा’ हा चित्रपट आधुनिक प्रेक्षकांसाठी एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भावनांचा संगम असलेला हा चित्रपट १७ जुलैपासून वेव्ह्ज ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे.

Web Title: Akshara haasan and satyajeet dubeys unique love story simulacra brings a gripping sci fi thriller with a futuristic romance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • OTT

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
2

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.