
OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन (Photo Credit- AI)
नेटफ्लिक्सने स्पष्ट केले आहे की, सध्या काही निवडक देशांमध्ये नवीन युजर्सना स्ट्रीमिंग सेवेचा फ्री ट्रायल पर्याय दिला जात आहे. कंपनीच्या ‘हेल्प सेंटर’नुसार, जर युझरचे अकाउंट, डिव्हाइस आणि लोकेशन या ऑफरसाठी पात्र असेल, तर साईन-अप (Sign-up) करताना फ्री ट्रायलचा पर्याय स्क्रीनवर आपोआप दिसेल. जर हा पर्याय दिसत नसेल, तर संबंधित अकाउंट सध्या या ऑफरसाठी पात्र नाही, असा त्याचा अर्थ होतो.
Free Netflix for 30 Days! 1. Create a new account.
2. Select “Try 30 days for ₹0.”
3. Choose your preferred plan.
4. Pay using UPI/Card.https://t.co/zElEdtTwAE DONE! Enjoy Netflix FREE for 1 month! NOTE: Make sure to cancel AutoPay if you don’t want to be charged after the… pic.twitter.com/AwLKxG8mcX — DealzTrendz (@dealztrendz) July 9, 2026
जरी नेटफ्लिक्सने भारतामध्ये या ऑफरच्या अधिकृत पुनरागमनाची घोषणा केली नसली, तरी एका अहवालात याला दुजोरा मिळाला आहे. नवीन ईमेल आयडीद्वारे नवीन नेटफ्लिक्स अकाउंट तयार करत असताना “₹0 मध्ये 30 दिवस आझमावून पहा” (Try 30 days for ₹0) अशी ऑफर स्क्रीनवर दिसून आल्याची पुष्टी या अहवालात करण्यात आली आहे.
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वच अकाउंट्ससाठी या फ्री ट्रायलचा कालावधी सारखा नाही. काही युजर्सना 30 दिवसांची फ्री ट्रायल मिळत आहे, तर काही युजर्सनी त्यांना केवळ 15 दिवसांचीच ऑफर मिळाल्याचे सांगितले आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी सध्या ‘A/B टेस्टींग’ पद्धतीचा वापर करत आहे; ज्यामध्ये वेगवेगळ्या युजर्सना वेगवेगळ्या प्रमोशनल ऑफर्स दाखवून त्यांच्या प्रतिसादाचा अभ्यास केला जातो. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपर्यंत 30 दिवसांची फ्री ट्रायल दिल्यानंतर, नेटफ्लिक्सने 2020 च्या सुमारास ही सेवा जगभरात पूर्णपणे बंद केली होती. आता या सुविधेच्या पुनरागमनामुळे स्ट्रीमिंग क्षेत्रात नेटफ्लिक्सचे युजर्स वाढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वेबसाईट किंवा ॲप: सर्वात आधी नेटफ्लिक्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा गुगल प्ले स्टोअर/ॲपल ॲप स्टोअरवरून ‘Netflix App’ डाउनलोड करा.
नवीन ईमेल आयडी: अशा ईमेल आयडीचा वापर करून नवीन अकाउंट तयार करा, ज्याचा वापर यापूर्वी कधीही नेटफ्लिक्सवर करण्यात आलेला नाही.
ऑफर तपासा: अकाउंट साइन-अप करताना तुम्हाला स्क्रीनवर “Try 30 days for ₹0” किंवा “15 दिवसांची फ्री ट्रायल” असा पर्याय दिसत आहे की नाही ते तपासा.
प्लॅन निवडा: तुमच्या आवडीचा कोणताही नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन प्लॅन (उदा. मोबाईल, बेसिक, स्टँडर्ड किंवा प्रीमियम) निवडा.
पेमेंट व्हेरिफिकेशन: डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा सपोर्टेड UPI आयडी यांसारखी वैध पेमेंट माहिती जोडा. (यामध्ये पडताळणीसाठी किरकोळ रक्कम कट होऊन पुन्हा जमा केली जाते).
रजिस्ट्रेशन पूर्ण करा: प्रक्रिया पूर्ण होताच तुमचा फ्री ट्रायल कालावधी सुरू होईल आणि तुम्ही त्वरित मोफत स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
नेटफ्लिक्सवर डिफॉल्ट स्वरूपात ‘ऑटो-पे’ (AutoPay) सुरू राहते. याचा अर्थ असा की, जर तुम्ही फ्री ट्रायलचा कालावधी संपण्यापूर्वी तुमचे सबस्क्रिप्शन कॅन्सल (Cancel Subscription) केले नाही, तर तुम्ही निवडलेल्या प्लॅनचे पैसे तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केले जातील.