Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mushtaq Khan: ‘श्रीमंतांच्या लग्नात वेटरचं काम करतील पण…’मुश्ताकच्या अंतिम दर्शनाबाबत रझा मुरादने व्यक्त केली खंत

Mushtaq Khan: मुश्ताक खान यांच्या अंतिम दर्शनाला अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी पाठ फिरवली असल्याचं दिसून आलं. रझा मुराद यांनी अगदी परखडपणे मत नोंदवत सर्वांची लाज काढली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 26, 2026 | 02:02 PM
रझा मुराद यांनी व्यक्त केली नाराजी (फोटो सौजन्य - IANS)

रझा मुराद यांनी व्यक्त केली नाराजी (फोटो सौजन्य - IANS)

Follow Us
Follow Us:
  • मुश्ताक खान यांच्या अंतिम दर्शनाला पोहचले नाहीत मोठे कलाकार
  • रझा मुराद यांनी व्यक्त केली नाराजी 
  • परखडपणे मांडले मत 
Mushtaq Khan: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान आता आपल्यात नाहीत. २४ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. २५ सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांची अनुपस्थिती असल्याबद्दल अभिनेते रझा मुराद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रझा मुराद यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून मुश्ताक खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अंत्यसंस्काराला बॉलिवूड कलाकारांच्या अनुपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mushtaq Khan: ४ सप्टेंबरला केलं शेवटचं शूटिंग; पुढचे १० दिवस तब्येत खालावली, मुश्ताक खान यांच्या मुलाने सांगितला अखेरचा प्रवास

इन्स्टाग्रामवर व्यक्त केले मत 

रझा मुराद म्हणाले, ‘हे दुर्दैवी आहे की त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एकही स्टार आला नाही. त्यांचे अनेक सहकारी आणि अभिनेते उपस्थित राहिले, पण एकही प्रमुख व्यक्ती आली नाही.’ ते पुढे म्हणाले, ‘जर एखाद्या उद्योगपतीच्या मुलाचे लग्न असते, तर हे स्टार्स केवळ उपस्थितच राहिले नसते, तर वेटरप्रमाणे पाहुण्यांची सेवाही केली असती, पण ज्या माणसाने चित्रपटसृष्टीला ५० वर्षे समर्पित केली, त्याच्या अंत्यसंस्काराला कोणीही उपस्थित राहिले नाही.’

रझा मुराद यांनी कोणत्याही विशिष्ट सेलिब्रिटींचे नाव घेतले नाही, पण काही अभिनेते मुश्ताक खान यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी ५० मिनिटेही देऊ शकले नाहीत, हे पाहून दुःख झाल्याचे ते म्हणाले. रझा मुराद पुढे म्हणाले की, ‘त्यांनी कोणाचीही खुशामत केली नाही; ते केवळ त्यांच्या कामाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचले होते.’ आपले म्हणणे संपवताना, रझा मुराद यांनी सर्वांना आठवण करून दिली की पैसा आणि प्रसिद्धी नेहमीच हातात हात घालून येत नाहीत.

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

मुश्ताक खान यांना काय झाले?

मुश्ताक खान यांचे २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाशी झुंज देत होते. तर काही कलाकारांनी अंत्यविधीला हजेरी लावली. अन्नू कपूर, गजेंद्र चौहान, रजत बेदी, जया भट्टाचार्य आणि राजपाल यादव यांच्यासह इतर अनेक जण २५ सप्टेंबर रोजी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. मुश्ताक खान यांच्या मुलाने त्यांच्या शेवटच्या प्रवासाबाबतही सांगितले. 

Web Title: Mushtaq khan last rites raza murad blunt reaction on big stars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Entertainment News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.