Mushtaq Khan: ४ सप्टेंबरला केलं शेवटचं शूटिंग (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
वेलकम चित्रपटामधला बल्लू आठवतोय का? मेरी एक टांग नकली है” हा डायलॉग बोलणारे मुश्ताक खान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्य अश्या अचानक जाण्याने अख्या बॉलिवूडला धक्का बसला. 300 अधिक सिनेमे 50 वर्ष इंडस्ट्रीत राहिलेला असा कलाकार अचानक गेला सिनेसृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली. त्यांचा मुलगा डायरेक्टर मोहसीन खानने वडीलांच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितले. त्याचे शब्द ऐकून डोळ्यांत पाणी येईल. Mushtaq Khan:
मोहसीन म्हणाला, “माझ्या वडिलांना गेल्या एक वर्षापासून कॅन्सर झाला होता. पण त्यांनी हार मानली नाही. उपचार घेत औषधांना उत्तम प्रतिसाद होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते काम करत होते. विश्वास बसणार नाही 4 सप्टेंबरपर्यंत त्यांनी शूटिंग केलं. मढ आयलंड इथे त्यांच्या टार्झन नावाच्या आगामी चित्रपटाचे शूट सुरु होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत रजत बेदी, चंकी पांडे आणि राजपाल यादव आहेत. हा चित्रपट सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा त्याच्या मुलगा अबीर सिंग आहे. पहिल्यांदा या चित्रपटाच्या माध्यमांतून अबीर सिनेसृष्टीमध्ये प्रवेश करत आहे. शेवटच्या कॅन्सरशी लढत असताना पण हा माणूस 4 सप्टेंबरला सेटवर जाऊन शूट करतो. यालाच खरा कलाकार म्हणतात.”
मोहसीन सांगतो, “गेल्या वर्षभर सगळं ठीक चाललं होतं. आम्हाला वाटलं ते बरे होतील. परंतू शेवटच्या 10 दिवसांत सगळं चित्र बदललं. त्यांची तब्येत अधिक खालावली. क्षणांची विलंब न करता आम्ही त्यांना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. उपचार सुरू असतानाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.मात्र दवाखान्यात असताना देखील त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. देवाघरी जाण्यापर्यंत त्यांनी कधीच त्रास दिला नाही.”
Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला …
50 वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी 300 पेक्षा जास्त सिनेमे, हजारो टीव्ही मालिकांचे एपिसोड आणि आता OTT वर पण काम केलं. मात्र चाहत्यांना वेलकम मधला बल्लू जास्त भावला, त्यांची लंगडत चालण्याचा स्टाईल आणि तो डायलॉग आज पण लोक विसरले नाहीत. गदर, हम है राही प्यार के सारख्या कितीतरी मोठ्या सिनेमात त्यांनी काम केलं.
लहानपणापासूनच मुश्ताक खान नाटकाची आवड होती. सहावीपासून शाळेच्या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. त्यानंतपर कॉलेजला गेल्यावर त्यांनी स्वतः नाटक लिहिण्यास सुरुवात केली, मुंबईत आल्यावर त्यांनीIPTA म्हणजे भारतीय जन नाट्य मंच ला जॉईन झाले. ही खूप मोठी नाट्य संस्था आहे. तिथे त्याने ‘द्रोणाचार्य’ नावाचं नाटक केलं आणि लोकांना त्यांचं काम खूप आवडलं. तिथूनच त्यांच्या कामाला ओळख मिळाली.त्यानंतर सिनेसृष्टीमध्ये पदापर्ण केले.
Actor Mushtaq Khan : धक्कादायक! आणखी एका अभिनेत्याचं अपहरण …
त्यांचा पहिला सिनेमा ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हा 1970 मध्ये आला. तिथू पुढे त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. आशिकी, हम है राही प्यार के, गदर, हेरा फेरी आणि वेलकम… एकापेक्षा एक हिट सिनेमे त्याने केले. तो कधीच हिरो झाला नाही पण प्रत्येक सिनेमात तो हिरो पेक्षा जास्त लक्षात राहिला. रंगमंचावरून आलेला हा कलाकार शेवटपर्यंत त्याच मातीशी जोडलेला राहिला.






