
२४ तासांत नाटकाची निर्मिती ते प्रेक्षकांचा थेट सहभाग
याचे एक उदाहरण म्हणजे यंदा एप्रिलमध्ये पुण्यात झालेला ‘नाटक एक्स्प्रेस’ हा २४ तासांचा नाट्यप्रयोग. या उपक्रमात ६० कलाकार, १२ दिग्दर्शक आणि १२ नाटककार सहभागी झाले होते. चिठ्ठीद्वारे संघ तयार करून प्रत्येक संघाला दृश्य आणि ध्वनीविषयक संकेत देण्यात आले. त्यावर आधारित संहिता तयार करणे, तालमी करणे आणि १० ते १५ मिनिटांची एकांकिका सादर करणे, अशी या प्रयोगाची रचना होती. कमी वेळेत एकत्रितपणे नाट्यनिर्मिती करण्याचा हा वेगळा प्रयत्न ठरला.
दुसरीकडे, प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी करण्यावरही भर दिला जात आहे. पारंपरिक रंगमंचाऐवजी गोलाकार किंवा खुल्या जागेत सादरीकरण, कलाकारांचा प्रेक्षकांमध्ये वावर आणि संवादातून प्रेक्षकांचा सहभाग असे प्रयोग होत आहेत. ‘फोर हॉर्समेन ऑफ नेम, फेम, पेन अँड डेथ’ या नाटकात गोलाकार रंगमंचावर समूह-समुपदेशनाच्या स्वरूपातून मानसिक आरोग्याचा विषय मांडण्यात आला होता.
प्रशांत दामले यांचा नाट्यरसिकांचे मत जाणून घेण्याचा नवा ‘फॉर्म’
या प्रयोगांना पूरक ठरण्यासाठी पुण्यातील श्रीराम लागू रंग-अवकाशासारख्या लवचिक रचनेच्या रंगमंचावरही भर दिला जात आहे. तसेच धायरीतील ‘मुक्त थेटर’सारख्या नव्या जागांमुळे प्रायोगिक नाटकांना शहराच्या मध्यवर्ती भागाबाहेरही व्यासपीठ उपलब्ध होत आहे. वेगळ्या संकल्पना, सादरीकरणाची नवी पद्धत आणि प्रेक्षकांशी थेट संवाद यांमुळे पुण्याची रंगभूमी केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता नवनिर्मितीचे प्रयोगक्षेत्र बनत आहे.
“रंगभूमीवर सध्या सादरीकरणाच्या अनेक नव्या पद्धती वापरल्या जात आहेत. पूर्वी कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात एक अंतर असायचे; मात्र आता प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचे प्रयोग होत आहेत. खुल्या जागेतील सादरीकरण, वेगळे नेपथ्य आणि प्रेक्षकांचा सहभाग यामुळे कलाकार म्हणून आम्हालाही नव्याने विचार करण्याची संधी मिळते.”
-शंतनू गायकवाड कलाकार
“आजच्या प्रेक्षकांना वेगळे विषय आणि वेगळ्या पद्धतीने मांडलेले नाटक पाहायला आवडते. त्यामुळे नाटक लिहिताना केवळ संवादांवर अवलंबून न राहता ध्वनी, प्रकाश, संगीत आणि सादरीकरणाच्या शक्यता लक्षात घ्याव्या लागतात. प्रयोगशील रंगभूमीमुळे नव्या लेखकांना विषय मांडण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.”
जीवन आघाव ( लेखक, कलाकार)
Ans: रंगभूमीवर सध्या सादरीकरणाच्या अनेक नव्या पद्धती वापरल्या जात आहेत.
Ans: ‘मुक्त थेटर’सारख्या नव्या जागांमुळे प्रायोगिक नाटकांना शहराच्या मध्यवर्ती भागाबाहेरही व्यासपीठ उपलब्ध होत आहे.