Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ventilator 2: दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा कामेरकर कुटुंबाची होणार भेट! ‘व्हेंटिलेटर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Ventilator 2: व्हेटिंलेटर या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. यातील कामरेकर कुटुंंबाने प्रेक्षकांना हसवलं, रडवलं. पुन्हा एकदा हे कुटुंब १० वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 07, 2026 | 10:17 AM
व्हेटिंलेटर २ ची घोषणा, कामतेकर कुटुंबीय पुन्हा भेटीला

व्हेटिंलेटर २ ची घोषणा, कामतेकर कुटुंबीय पुन्हा भेटीला

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा!
  • लवकरच येणार व्हेंटिलेटर २ 
  • नुकतीच करण्यात आली घोषणा, कामरेकर कुटुंबीय पुन्हा येणार 
Ventilator 2: दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या कामेरकर कुटुंबाने प्रेक्षकांना हसवलं, भावूक केलं आणि नात्यांचे अनेक रंग दाखवले. रुग्णालयाच्या परिसरात घडणाऱ्या या कथेतील प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, आपापसातील गंमतीशीर संवाद आणि भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले. 

आता याच कामेरकर कुटुंबाची गोष्ट पुढे नेण्यासाठी दिग्दर्शक राजेश मापुस्कर सज्ज झाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘व्हेंटिलेटर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅगीज पिक्चर्स यांनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Sanjay Mone : माधुरींच्या कार्यक्रमावर टीका अन् सोशल मीडियावर ट्रोलिंग; संजय मोने यांनी मौन सोडलं!

पुन्हा १० वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला कामेरकर कुटुंबीय 

‘तेच सगळे कामेरकर, पुन्हा एकदा १० वर्षांनंतर… त्यांच्यातले काही गेले, काही राहिले… गेलेले हसतायत आणि राहिलेले…!’ अशा मिश्किल शब्दांत ‘व्हेंटिलेटर २’ची घोषणा करण्यात आली आहे. ‘घ्या रे घ्या सारे घ्या…’ या खास अंदाजातील टॅगलाईनमुळे चित्रपटाच्या घोषणेला आणखी एक वेगळी रंगत आली असून यावेळी कथा नेमकी काय असेल, पहिल्या चित्रपटातील नात्यांचा गोडवा, कौटुंबिक गंमतीजंमती आणि भावनिक क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

काय म्हणाले राजेश मापुस्कर 

दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटासोबत माझ्या अनेक आठवणी आणि भावना जोडल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आजही मनात ताजं आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच विश्वात परतताना एक वेगळाच आनंद आणि जबाबदारीची जाणीव आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.’

निर्मात्या मधु चोप्रांनी व्यक्त केली भावना 

निर्मात्या प्रियंका चोप्रा जोनस आणि डॉ. मधु चोप्रा म्हणतात, ‘व्हेंटिलेटर’ला मिळालेलं प्रेम आमच्यासाठी नेहमीच खास राहिलं आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे या कथेचा पुढचा भाग घेऊन येणं हा आमच्यासाठी आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा या कुटुंबाला एकत्र आणताना पहिल्या भागाशी जोडलेल्या आठवणी आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा या दोन्हींचा विचार केला आहे. यावेळीही प्रेक्षकांना हसवणारा, विचार करायला लावणारा आणि मनाला भिडणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असेल.’

पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅगीज पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर २’चे लेखन आणि दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केलं आहे. प्रियंका चोप्रा जोनस, डॉ. मधु चोप्रा आणि राजेश मापुस्कर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून या नव्या पर्वाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. आता दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंबात नेमकं काय घडणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Ramayana Movie: २४ कॅरेट सोन्याचं रावणाचं सिंहासन अन् पुष्पक विमानासाठी सहा वर्षांची मेहनत; ‘रामायण’ची भव्य तयारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: Ventilator चित्रपटाचे निर्माते कोण आहेत?

    Ans: अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधु चोप्रा व्हेंटिलेटरचे निर्माते आहेत

  • Que: पहिला व्हेंटिलेटर चित्रपट कधी प्रदर्शित झाला होता?

    Ans: 4 नोव्हेंबर, 2016 रोजी पहिला व्हेंटिलेटर चित्रपट प्रदर्शित झाला

  • Que: दुसरा चित्रपट कोण दिग्दर्शित करत आहे?

    Ans: व्हेटिंलेटर २ देखील दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे

Web Title: Ventilator 2 sequel announcement after 10 years dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Marathi Rangbhumi: नाटकाची संकल्पना ते प्रत्यक्ष सादरीकरण; पुण्यात रंगकर्मींचा अनोखा प्रयोग चर्चेत
1

Marathi Rangbhumi: नाटकाची संकल्पना ते प्रत्यक्ष सादरीकरण; पुण्यात रंगकर्मींचा अनोखा प्रयोग चर्चेत

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार
2

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
3

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र
4

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.