Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…

पहाटे २.३० वाजता मित्राला आलेला तो मेसेज अखेरचा ठरला... काही तासांतच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकृती अचानक खालावली. गोव्यातील निवासस्थानी त्यांना वाचवण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे CPR देण्यात आला. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 08, 2026 | 11:35 AM
नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्...

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्...

Follow Us
Follow Us:
  • पहाटे २.३० वाजता मित्राला तब्येत बिघडल्याचा मेसेज
  • गोव्यातील घरी कार्डियाक अरेस्ट; ४५ मिनिटे CPR
  • मणिपाल रुग्णालयात उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचे निधन
 

गोवा : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील निवासस्थानी कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे CPR देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना वाचवता आले नाही. नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वीच्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलं, याची माहिती मणिपाल रुग्णालयातील डॉ. शेखर सालकर यांनी दिली आहे. त्यानुसार, पहाटे सुमारे २.३० वाजता नाना पाटेकर यांनी आपल्या मित्राला तब्येत ठीक नसल्याचा मेसेज केला होता. काही वेळाने मित्राने हा मेसेज पाहिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला आणि पहाटे सुमारे ४ वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचला.

हेही वाचा: Crime News: ‘दृश्यम’ पाहून वडिलांच्या हत्येचा कट; एक फोन कॉल ठरला घातक, मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

घरीच प्रकृती झपाट्याने खालावली

मित्र घरी पोहोचला त्यावेळी नाना पाटेकर यांची प्रकृती बिघडलेली होती. त्यांना घाम फुटला होता आणि प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यानंतर तातडीने मदत मिळवण्यासाठी त्यांच्या केअरटेकरशी संपर्क करण्यात आला. केअरटेकरने जवळच्या रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाची इमर्जन्सी टीम तातडीने नाना पाटेकर यांच्या घरी पोहोचली. डॉक्टरांनी घटनास्थळीच कार्डियाक मसाज आणि CPR सुरू केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

४५ मिनिटे जीव वाचवण्याचे प्रयत्न

रुग्णालयात पोहोचल्यानंतरही डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे ४५ मिनिटे सतत CPR देण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पहाटे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, हे प्रकरण मेडिको-लीगल केस म्हणून नोंदवण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. मृत्यूचे वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली. नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप उमटवली. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Nana patekar death final hours goa cardiac arrest 45 minutes cpr sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Death
  • latest news
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल
1

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
2

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar Funeral: चाहत्यांना अश्रू अनावर; नाना पाटेकरांवर कुठे होणार अंत्यसंस्कार? माहिती समोर आली
3

Nana Patekar Funeral: चाहत्यांना अश्रू अनावर; नाना पाटेकरांवर कुठे होणार अंत्यसंस्कार? माहिती समोर आली

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
4

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.