Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

नाना पाटेकर यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चांगले संबंध होते. शिवसेना पक्षफुटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. 'मला शिवसेना फुटल्यावर वाईट वाटलं. मी बाळासाहेबांपासून सर्वांशी जवळ होतो. बाळासाहेब मला फोन करून 'गाढवा काय करतोस रे' असं म्हणायचे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2026 | 08:12 AM
नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

Follow Us
Follow Us:
  • नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन
  • अनेक राजकीय नेत्यांशीही जिव्हाळ्याचे संबंध
  • चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले नाव म्हणजे नाना
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते 75 वर्षांचे होते. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी होते. तेथेच ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीतच नाहीतर राजकीय नेत्यांशीही जिव्हाळ्याचे संबंध होते. नाना पाटेकर यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याबाबत विधान केले होते. “शरद पवार एकेकाळी माझे हिरो होते. मात्र, आता राजकारण बदललं आहे.”

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांनी भरकार्यक्रमात स्तुती केली होती. “राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे. मुख्यमंत्रिपद भूषवलं, पण कुणी बोट दाखवू शकत नाही.”

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा

नाना पाटेकर यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चांगले संबंध होते. शिवसेना पक्षफुटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘मला शिवसेना फुटल्यावर वाईट वाटलं. मी बाळासाहेबांपासून सर्वांशी जवळ होतो. बाळासाहेब मला फोन करून ‘गाढवा काय करतोस रे’ असं म्हणायचे. बाळासाहेब गेल्यावर मातोश्रीशी संबंध संपला. नानांनी एकदा सल्ला दिला होता की, “राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं, मराठी माणसाच्या भल्यासाठी.”

चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले नाव म्हणजे नाना

विश्वजीत दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर म्हणजे चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि नावाजलेले कलाकार. नानांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला. १९७८ मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी आपले पदार्पण केले. पुढे नटसम्राट, प्रहार, आपला माणूस, क्रांतिवीर, तिरंगा, खामोशी अशा चित्रपटांतून त्यांनी भरपूर लोकप्रियता मिळवली. नटसम्राट हा त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट. अनेक चित्रपटांतील त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप उमटवली की नाना पाटेकर हे नाव अभिनयाच्या विश्वात अजरामर झाले.

Web Title: Nana patekar shared close bonds not only within the film industry but also with political leaders nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
1

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
2

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा
3

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
4

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.