Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix Trending: Netflix वर कोणता सिनेमा गाजतोय? 2 तास 21 मिनिटांच्या अॅक्शन-थ्रिलरने सूर्याच्या चित्रपटाला टाकलं मागे

Netflix Trending: Ravi Teja चा 2 तास 21 मिनिटांचा ‘इरूमुडी’ Netflix वर ट्रेंडिंगमध्ये नंबर 1 वर आहे. या चित्रपटाने सूर्याच्या ‘विश्वनाथ अँड सन्स’लाही मागे टाकलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 27, 2026 | 01:14 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Netflix वर पहिल्या क्रमांकावर ‘इरूमुडी’
  • मुलीच्या मृत्यूनंतर बदलतो त्रिनाधचा आयुष्याचा मार्ग
  • गावातील मुलींच्या रहस्यमय बेपत्ता होण्याचं गूढ
Netflix Trending: OTT प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यामुळे सध्या कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, याकडे सिनेप्रेमींचं लक्ष असतं. अशातच Netflix वर 2 तास 21 मिनिटांच्या ‘इरूमुडी’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट सध्या Netflixच्या ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं जात आहे.

Netflix वर पहिल्या क्रमांकावर ‘इरूमुडी’

रवी तेजाच्या या चित्रपटाचा Netflixवर 18 सप्टेंबर रोजी प्रीमियर झाला. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट ट्रेंडिंग यादीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातील काही दृश्ये सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, रवी तेजाच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे.

विशेष म्हणजे, ‘इरूमुडी’ने Netflixच्या ट्रेंडिंग यादीत अभिनेता सूर्याच्या ‘विश्वनाथ अँड सन्स’ या चित्रपटालाही मागे टाकल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुलीच्या मृत्यूनंतर बदलतो त्रिनाधचा आयुष्याचा मार्ग

‘इरूमुडी’ची कथा त्रिनाध नावाच्या व्यक्तीभोवती फिरते. त्रिनाध पत्नी कावेरी आणि मुलगी मणिकांतसोबत राहत असतो. सुरुवातीला त्याचा स्वभाव भांडखोर आणि मारामारी करणारा असतो. मात्र, मुलीसाठी तो स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि शांत राहण्याची शपथ घेतो.

यानंतर त्रिनाध आपल्या कुटुंबासोबत सुखाने आयुष्य जगत असतो. मात्र, त्याच्या या शांत आयुष्याला अचानक धक्का बसतो. त्याच्या मुलीचा रहस्यमयरीत्या मृत्यू होतो आणि त्यानंतर कथेला एक वेगळंच वळण मिळतं.

गावातील मुलींच्या रहस्यमय बेपत्ता होण्याचं गूढ

मुलीच्या मृत्यूनंतर त्रिनाधला आणखी एक धक्कादायक गोष्ट समजते. त्याच्या गावातील अनेक मुली रहस्यमयरीत्या गायब होत असल्याचं त्याच्या लक्षात येतं. यानंतर तो आपलं मौनव्रत सोडतो आणि या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हेगारांविरोधात लढण्याचा निर्णय घेतो.

चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये या संपूर्ण प्रकरणामागचं मोठं रहस्य दडलं असल्याचं सांगितलं जात आहे. हे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ‘इरूमुडी’ Netflixवर पाहावा लागेल.

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव

रवी तेजासोबत हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात रवी तेजाने त्रिनाधची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत प्रिया भवानी शंकर, रमेश इंदिरा, कार्तिक अडुसुमल्ली, अजय घोष आणि राजकुमार कासिरेड्डी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

चित्रपटाचं दिग्दर्शन शिव निर्वाणा यांनी केलं आहे. अॅक्शन, थ्रिलर आणि रहस्याचा संगम असलेल्या या चित्रपटाला सोशल मीडियावरही प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे Netflixच्या ट्रेंडिंग यादीतील ‘इरूमुडी’कडे सध्या सिनेप्रेमींचं लक्ष वेधलं गेलं आहे.

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण

Web Title: Netflix trending irumudi ravi teja action thriller surya movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Netflix
  • OTT

संबंधित बातम्या

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण
1

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव
2

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव

Ranbir Kapoor: रणबीर कपूरसोबत मिस्टर बीस्टचा देसी अंदाज; ‘जय श्री राम’ म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल
3

Ranbir Kapoor: रणबीर कपूरसोबत मिस्टर बीस्टचा देसी अंदाज; ‘जय श्री राम’ म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
4

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.