(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
‘पंचायत’च्या मागील सीझनमध्ये फुलेराच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. क्रांती देवी (सुनीता राजवर) यांनी नव्या प्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बनराकस अर्थात दुर्गेश कुमार यानेही त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे फुलेराच्या नव्या प्रशासनाने आता स्वतःचेच नियम तयार केले आहेत. याच पार्श्वभूमीवर बनराकसने ‘पंचायत सीझन ५’च्या रिलीज डेटबाबत चाहत्यांसमोर एक मजेशीर आव्हान ठेवलं आहे.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
१ कोटी झेंडूंच्या हाराची अनोखी अट काय?
एका खास ऑडियन्स चॅलेंजच्या माध्यमातून चाहत्यांना एकत्र येऊन फुलेराच्या नव्या प्रशासनाला १ कोटी झेंडूंच्या फुलांचा भव्य हार अर्पण करायचा आहे. हे आव्हान पूर्ण झाल्यानंतरच ‘पंचायत सीझन ५’च्या रिलीज डेटचा खुलासा केला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या अनोख्या चॅलेंजची चर्चा रंगली आहे.
‘पंचायत’च्या नव्या सीझनची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी हे आव्हान खास ठरणार आहे. आता १ कोटी झेंडूंच्या हाराची अट पूर्ण करण्यासाठी चाहते कसा प्रतिसाद देतात आणि बनराकस रिलीज डेट कधी जाहीर करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे चाहत्यांनो, फुलेराच्या नव्या प्रशासनाला हार अर्पण करा आणि ‘पंचायत सीझन ५’च्या पुनरागमनाची तारीख अनलॉक करण्यात आपला वाटा उचला!
येथे सहभागी व्हा: https://panchayatdate.com






