Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ‘राजा शिवाजी’चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर 12 सप्टेंबरला रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर होणार आहे. चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत पाहता येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 04, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Raja Shivaji TV Premiere: छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि प्रेरणादायी कारकीर्द मोठ्या पडद्यावर मांडणारा अभिनेता-दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आता टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित या चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर 12 सप्टेंबरला रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर होणार आहे.

विशेष म्हणजे, निवडक केबल आणि डीटीएच ऑपरेटरवर प्रेक्षकांना ‘राजा शिवाजी’ हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या भाषेत ही ऐतिहासिक कथा अनुभवता येणार आहे.

रितेश देशमुखांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. महाराजांचे शौर्य, नेतृत्व, दूरदृष्टी आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहेत.

चित्रपटात रितेश देशमुख यांच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा

अजय-अतुलच्या संगीताचीही खास चर्चा

‘राजा शिवाजी’च्या भव्यतेमध्ये चित्रपटाचे संगीतही महत्त्वाची भूमिका बजावते. अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिले असून, संतोष सिवन यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटातील भव्य सेट्स, अॅक्शन सीक्वेन्स आणि कलाकारांच्या अभिनयाचेही प्रेक्षकांकडून कौतुक झाले.

रितेश देशमुख म्हणाले, ‘ही कथा दिग्दर्शित करणं माझ्यासाठी मोठा सन्मान’

वर्ल्ड टीव्ही प्रीमियरबद्दल रितेश देशमुख यांनी आनंद व्यक्त केला. ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे आणि त्यांची कथा दिग्दर्शित करणे ही आपल्यासाठी मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

थिएटरमध्ये चित्रपटाला मिळालेले प्रेम खास असल्याचे सांगत, आता स्टार गोल्डच्या माध्यमातून ही कथा देशभरातील लाखो घरांपर्यंत पोहोचणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

हिंदी आणि मराठी भाषेचा पर्याय

‘राजा शिवाजी’चा टीव्ही प्रीमियर आणखी खास ठरणार आहे. निवडक केबल आणि डीटीएच ऑपरेटरवर प्रेक्षकांना चित्रपट हिंदी किंवा मराठी भाषेत पाहता येणार आहे. रिमोटवरील एका बटणाद्वारे ऑडिओ भाषा बदलण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

जेनेलिया देशमुख यांनीही या प्रीमियरबद्दल उत्साह व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांची कारकीर्द प्रेक्षकांसमोर आणणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. आता स्टार गोल्डच्या माध्यमातून हा चित्रपट देशभरातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

12 सप्टेंबरला घरबसल्या अनुभवता येणार ‘राजा शिवाजी’

थिएटरनंतर आता ‘राजा शिवाजी’चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर होणार असल्याने चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 12 सप्टेंबरला रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचा पर्याय असल्याने कुटुंबासोबत हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Web Title: Raja shivaji tv premiere star gold september 12 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
1

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम
2

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा
3

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या शूटिंगचा अनोखा अनुभव; गावोगावी फिरून माईकवर टीम करायची अशी विनंती; जाणून घ्या खास किस्सा

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन
4

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.