Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादवांना सुप्रीम कोर्टाने सशर्त दिलासा दिला आहे. ९ सप्टेंबरपर्यंत ५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 09, 2026 | 09:06 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rajpal Yadav Cheque Bounce Case: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या चेक बाउन्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत राजपाल यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सुनावलेल्या तीन महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला आणि ७.५ कोटी रुपये परत करण्याच्या आदेशाला त्यांनी आव्हान दिलं होतं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना तूर्तास दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा एका अटीवर देण्यात आला आहे.

आज ५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

एएनआयच्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माता आणि अर्थपुरवठादार मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा भोगण्यासाठी आत्मसमर्पण करण्यापासून सूट हवी असल्यास राजपाल यादव यांनी ९ सप्टेंबरपर्यंत ५ कोटी रुपये न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

राजपाल यादव यांच्या याचिकेवर न्यायालयाने सशर्त नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

सात चेक बाउन्स प्रकरणांमध्ये दोषसिद्धी

दिल्ली उच्च न्यायालयाने १० जुलै रोजी दिलेल्या निर्णयात परक्राम्य दस्तऐवज कायद्याच्या (Negotiable Instruments Act) कलम १३८ अंतर्गत सात आरोपांमध्ये राजपाल यादव यांची दोषसिद्धी आणि तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली होती.

त्यानंतर त्यांना शिक्षा भोगण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाविरोधात राजपाल यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Deepika Ranveer Photoshoot: लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त दिलासा

सरन्यायाधीश जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तोंडी सुनावणीनंतर न्यायालयाने राजपाल यादव यांना आत्मसमर्पण करण्यापासून सशर्त सूट दिली. मात्र, त्यासाठी ५ कोटी रुपये जमा करण्याची अट ठेवण्यात आली आहे.

आता राजपाल यादव यांना ही रक्कम ९ सप्टेंबरपर्यंत जमा करावी लागणार असून, त्यानंतर १५ सप्टेंबरला या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!

Web Title: Rajpal yadav cheque bounce case supreme court relief 5 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Cheque Bounce
  • Entertainemnt News
  • rajpal yadav

संबंधित बातम्या

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
1

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
2

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
3

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
4

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.