Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakhi Sawant : ‘विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्यांना हेच उत्तर’; सॅनिटरी पॅड हातात घेऊन राखी सावंतचा अनोखा विरोध चर्चेत

दिल्लीत सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून, अनेक कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अशातच अभिनेत्री राखी सावंतने पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2026 | 06:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • राखी सावंतनेही सरकारवर टीका केली आहे.
  • २२ जुलै २०२६ रोजी दादर येथील आंदोलनात सहभाग घेतला होता.
  • सत्ताधारी सरकारवर टीकेची झोड उठवली.
दिल्लीत सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत. विविध ठिकाणी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. मुंबईतील आंदोलनालाही सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यापैकी अनेक जण विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनेत्री वनिता खरात तसेच अभिनेता रोहित माने यांच्या पत्नीने २२ जुलै २०२६ रोजी दादर येथील आंदोलनात सहभाग घेतला होता. याशिवाय हिप-हॉप इंडस्ट्रीतील रफ्तार आणि एमीवे बंटाई यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. अशातच राखी सावंतनेही सरकारवर टीका केली आहे.

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

एका पत्रकार परिषदेत राखी सावंतने सत्ताधारी सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच सॅनिटरी पॅड हातात घेत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी ती म्हणाली, “मला जंतर-मंतरवर जमलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाईट वाटतं. देशभरातून विद्यार्थी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर जमत आहेत. मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहे. मी त्यांना विनंती करू इच्छिते की, या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.”

सॅनिटरी पॅड हातात घेऊन केला तीव्र निषेध!

इतकं बोलल्यानंतर राखीने हातात सॅनिटरी पॅड घेत माध्यमांसमोर दाखवत म्हटलं, “जे लोक विद्यार्थ्यांना मारत आहेत, त्यांच्यावर मी माझ्या पिरेडचं हे… तुम्ही लोकं एक चांगली शिक्षणव्यवस्था देऊ शकत नाही का? मी तुम्हाला वोट दिला आहे. मी हे तुमच्यावर फेकू इच्छिते.”

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

राखीच्या या तीव्र निषेधाची चर्चा सर्व माध्यमांवर होत आहे. राखीने केलेल्या या धाडसी निषेधाचे कौतुक अनेकांनी केले आहे तर काही विरोधी प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.

Web Title: Rakhi sawant protests with sanitary pad demands action over student violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • CJP
  • CJP Protest
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
1

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.