Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकार भाजपचे आहे, त्यांनी…; ‘सीजेपी’च्या परदेशी निधीच्या आरोपांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

परदेशी निधीच्या नियमनासाठी केंद्राच्या गृह मंत्रालयाचा एफसीआरए हा विभाग कार्यरत आहे. त्यामुळे अभिजीत दिपके यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (सीजेपी) परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2026 | 01:07 PM
सरकार भाजपचे आहे, त्यांनी...; ‘सीजेपी’च्या परदेशी निधीच्या आरोपांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

सरकार भाजपचे आहे, त्यांनी...; ‘सीजेपी’च्या परदेशी निधीच्या आरोपांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

Follow Us
Follow Us:

पुणे : परदेशी निधीच्या नियमनासाठी केंद्राच्या गृह मंत्रालयाचा एफसीआरए हा विभाग कार्यरत आहे. त्यामुळे अभिजीत दिपके यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (सीजेपी) परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. सरकार भाजपचे आहे, त्यांनी एफसीआरएने तपास करावा, केवळ आरोप करू नयेत, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शनिवारी निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.

 

अमेरिकन गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्याकडून सीजेपीला फंडींग होत असल्याचा आरोप भाजपचे काही नेत्यांनी केल्याच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, परदेशी निधीच्या नियमनासाठी केंद्राच्या गृह मंत्रालयाचा एफसीआरए हा विभाग कार्यरत आहे. केंद्रात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी केवळ आरोप न करता एफसीआरएकडूनन तपास करावा. तसेच पुण्यात सीजेपीच्या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी मिळते, मात्र दिल्लीत परवानगी मिळत नाही. दिल्लीत आणि पुण्यात एकच कायदा लागू आहे ना. मग एकाच देशात दोन वेगवेगळे कायदे लागू कसे होऊ शकतात, असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या कामकाजात सुधारणा करण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे आणि पारदर्शकतेची मागणी करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे. अचानक मतदार संख्या वाढते, नंतर मतदार याद्यांमधून नावे काढली जातात, हा काय प्रकार आहे कळत नाही. याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. मात्र, निवडणुक आयोग आणि सरकारी यंत्रणा माहितीच देत नाही, डेटाच देत नाही, मग करायचे काय, असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न गंभीर आहे. सरकार झाडे लावण्यासाठी १८ कोटीच्या गाड्या घेते, मात्र शेतकऱ्यांना पैसै देत नाही. प्रधानमंत्री कृषी योजना आणि नमो कृषी सन्मान योजनेचे शेवटचे पैसे १३ मार्च रोजी मिळाले, त्यानंतर पैसे आले नाहीत. सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाच्या कामाला लागावे, असे आवाहन सुळे यांनी केले.

शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे

आम्ही पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवत आहोत. पुणे आणि संभाजीनगर पदवीधरच्या जागा आमच्या आहेत. त्यामुळे दोन्ही जागांवर आम्ही उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाकडूनही उमेदवार उभा करण्यात आला आहे. हे आघाडी आणि युतींमध्ये घडत असते. कालही शिवसेना पक्ष आमचा सहकारी होता, आजही आहे आणि उद्याही असेल. आमचे शिवसेनेसोबत अद्यापही बोलणे सुरू आहे, अशीही माहिती सुळे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

पवार कुटुंबात यंदा दिवाळी नाही

आमच्या घरातला कर्ता पुरुष अजित दादा गेलेला आहे. त्यामुळे पवार कुटुंबात यंदा दिवाळी नाही. दादा तर नाहीत, दुसरीकडे दुष्काळ आहे. ज्या लोकांमुळे आम्ही आहोत, ते लोक अडचणीत असताना आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही, असेही सुळे यांनी सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (सीजेपी) परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप कोणी केला?

    Ans: भाजपकडून सीजेपीला परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: सुप्रिया सुळे यांनी भाजपला काय आव्हान दिले?

    Ans: परदेशी निधीबाबत केवळ आरोप न करता केंद्र सरकारने एफसीआरएच्या माध्यमातून चौकशी करावी, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिले.

  • Que: एफसीआरए विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे?

    Ans: परदेशी निधीच्या नियमनासाठी एफसीआरए विभाग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

Web Title: Supriya sule has taken an aggressive stance regarding the allegations being leveled against cjp by the bjp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • CJP
  • MP Supriya Sule
  • pune news

संबंधित बातम्या

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू
1

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू

Abhijeet Dipke : शाहरुख खानचा फोटो, दोन सहकाऱ्यांची आठवण; अभिजीत दिपके तुरुंगातून बाहेर येताच अ‍ॅक्शन मोडमध्ये?
2

Abhijeet Dipke : शाहरुख खानचा फोटो, दोन सहकाऱ्यांची आठवण; अभिजीत दिपके तुरुंगातून बाहेर येताच अ‍ॅक्शन मोडमध्ये?

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ
3

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई
4

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.