Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Movie Collection: ‘रामायणम्’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; दिवाळीत केली जोरदार कमाई, चार दिवसांत रचला नवा विक्रम

Ramayana Movie Collection: रणबीर कपूरच्या ‘रामायणम्’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. चार दिवसांत जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार करत ‘आदिपुरुष’ आणि ‘टायगर ३’चे विक्रम मोडले.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 09, 2026 | 11:02 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Movie Collection: बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांपैकी एक असलेला रणबीर कपूरचा ‘रामायणम्’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. प्रदर्शनापासूनच या चित्रपटाने कमाईचे नवनवे विक्रम केले आहेत. विशेष म्हणजे, दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अवघ्या चार दिवसांत ‘रामायणम्’ने जगभरात ५०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून, प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ३९३ कोटी रुपयांच्या जागतिक कमाईलाही मागे टाकलं आहे.

पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ‘रामायणम्’चा जलवा

‘रामायणम्’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल शोसह सुरुवात केली. भारतात पहिल्या दिवशी चित्रपटाने ६४.८५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. हा आकडा चित्रपटाच्या भव्य बजेटच्या तुलनेत कमी वाटत असला, तरी बॉलिवूडच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक ओपनिंग ठरली आहे.

पहिल्या दिवसानंतर शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली. या दिवशी चित्रपटाने ४८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मात्र, शनिवारी कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. शनिवारी चित्रपटाने जवळपास ७० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांतच ‘रामायणम्’ची भारतातील एकूण निव्वळ कमाई १८३ कोटी रुपयांवर पोहोचली.

Salman Khan Announces Rs 11 Movie Ticket: सलमान खानचा सिनेमा पाहण्याची सुवर्णसंधी! तिकीट फक्त ११ रुपये, पण आहे एक खास अट
दिवाळीत मोडला ‘टायगर ३’चा विक्रम

रविवारी दिवाळीचा सण असल्यामुळे देशातील काही भागांमध्ये चित्रपटगृहांमधील गर्दी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या सगळ्या अंदाजांना मागे टाकत ‘रामायणम्’ने रविवारीही चांगली कमाई केली. चौथ्या दिवशी चित्रपटाने भारतात ५६.१५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली.

विशेष म्हणजे, दिवाळीच्या विकेंडला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘रामायणम्’ने नवा विक्रम केला आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत चित्रपटाने सलमान खानच्या ‘टायगर ३’चा दिवाळीतील सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडला. २०२३ मध्ये दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘टायगर ३’ने ४४.५० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली होती.

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला
चार दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार

चार दिवसांच्या कमाईनंतर ‘रामायणम्’ची भारतातील निव्वळ कमाई २३८.८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर भारतातील एकूण कमाई २८५.२० कोटी रुपये असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. जगभरातील कमाईनेही ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

अवघ्या चार दिवसांत प्रभासच्या ‘आदिपुरुष’च्या ३९३ कोटी रुपयांच्या जागतिक कमाईला मागे टाकत ‘रामायणम्’ने बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवून दिली आहे. आगामी दिवसांत हा चित्रपट आणखी किती विक्रम आपल्या नावावर करतो, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Ramayana movie collection 500 crore worldwide box office record ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

रितेश देशमुख यांचे चित्रपट धीरज देशमुख का पाहत नाहीत? लहान भावाने सांगितलं खास कारण
1

रितेश देशमुख यांचे चित्रपट धीरज देशमुख का पाहत नाहीत? लहान भावाने सांगितलं खास कारण

Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या स्टंट डबलने दाखवली ‘रामायण’च्या सेटची भव्य झलक; वनवासातील दृश्य पाहून चाहते थक्क!
2

Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या स्टंट डबलने दाखवली ‘रामायण’च्या सेटची भव्य झलक; वनवासातील दृश्य पाहून चाहते थक्क!

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर
3

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला
4

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.