Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या स्टंट डबलने दाखवली ‘रामायण’च्या सेटची भव्य झलक; वनवासातील दृश्य पाहून चाहते थक्क!

Ranbir Kapoor: ‘रामायण’मध्ये रणबीर कपूरचा स्टंट डबल म्हणून काम केलेल्या ल्यूक इओन्नूने सेटवरील BTS फोटो शेअर केले. त्याने रणबीरच्या अभिनयाचंही कौतुक केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 08, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ranbir Kapoor: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: भाग १’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणबीर कपूरच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्येही त्याची मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत ‘रामायण’ने जगभरात ३७५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या भव्य सेटची झलक आता सोशल मीडियावर समोर आली आहे. रणबीर कपूरचा स्टंट डबल म्हणून काम केलेल्या ल्यूक इओन्नूने चित्रपटाच्या सेटवरील काही खास पडद्यामागचे फोटो शेअर केले आहेत.

रणबीरच्या स्टंट डबलने शेअर केले सेटवरील फोटो

ल्यूक इओन्नूने सोशल मीडियावर ‘रामायण’च्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून चित्रपटासाठी उभारण्यात आलेल्या भव्य सेटची, वेशभूषेची, उपकरणांची आणि शूटिंगच्या तयारीची झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, या फोटोंमधून चित्रपटाच्या पडद्यामागे किती मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे, याची कल्पना येते.

ल्यूकने यापूर्वी ‘वंडर वुमन’, ‘वंडर वुमन १९८४’ आणि ‘नो टाइम टू डाय’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले आहे. ‘रामायण’सारख्या भव्य पौराणिक चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.

रणबीर कपूरचं केलं भरभरून कौतुक

ल्यूक इओन्नूने या चित्रपटात रणबीर कपूरचा स्टंट डबल म्हणून काम केले होते. त्याने रणबीरसोबत काम करण्याचा अनुभवही सोशल मीडियावर शेअर केला. रणबीर हा आपण आतापर्यंत काम केलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असल्याचं त्याने म्हटलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये ल्यूकने लिहिलं, “‘रामायण’सारख्या महत्त्वाच्या चित्रपटाचा भाग होण्याची आणि रणबीर कपूरचा स्टंट डबल म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. रणबीर खरोखरच मी काम केलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्यासोबत काम करणं हे माझं भाग्य आहे.”

तसेच, ही संधी दिल्याबद्दल त्याने इयान व्हॅन टेम्परली यांचे आणि चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार व तंत्रज्ञांचे आभार मानले. हा प्रवास आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचंही त्याने नमूद केलं.

Madhuri Dixit Jamal Kudu Dance: वयाच्या ५९ व्या वर्षीही माधुरी दीक्षितचा जलवा कायम; दिवाळी पार्टीतील ‘जमाल कुडू’ डान्स व्हायरल!

‘रामायण’मध्ये रणबीर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका

‘रामायण: भाग १’मध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची भव्यता, प्रॉडक्शन डिझाइन, सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक सादरीकरणाचं कौतुक होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या काळातही चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीतून दिसत आहे.

दरम्यान, रणबीर कपूरच्या अभिनयासोबतच चित्रपटाच्या भव्य सेटची झलकही चाहत्यांसाठी आकर्षण ठरत आहे. ल्यूक इओन्नूने शेअर केलेल्या या फोटोंमुळे ‘रामायण’च्या पडद्यामागील मेहनतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Divyanka Tripathi: T1-T2 चा सस्पेन्स अखेर संपला! दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहियाने जाहीर केली जुळ्यांची नावं

Web Title: Ranbir kapoor ramayana movie stunt double luke ioannu bts photos ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर
1

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला
2

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला

Stranger Things Prequel: ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चाहत्यांसाठी मोठी भेट; ‘Other Worlds’मधून उलगडणार वेक्नाच्या जन्माची कहाणी!
3

Stranger Things Prequel: ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चाहत्यांसाठी मोठी भेट; ‘Other Worlds’मधून उलगडणार वेक्नाच्या जन्माची कहाणी!

Madhuri Dixit Jamal Kudu Dance: वयाच्या ५९ व्या वर्षीही माधुरी दीक्षितचा जलवा कायम; दिवाळी पार्टीतील ‘जमाल कुडू’ डान्स व्हायरल!
4

Madhuri Dixit Jamal Kudu Dance: वयाच्या ५९ व्या वर्षीही माधुरी दीक्षितचा जलवा कायम; दिवाळी पार्टीतील ‘जमाल कुडू’ डान्स व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.