Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Movie: २४ कॅरेट सोन्याचं रावणाचं सिंहासन अन् पुष्पक विमानासाठी सहा वर्षांची मेहनत; ‘रामायण’ची भव्य तयारी

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटासाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. रावणाच्या २४ कॅरेट सोन्याच्या सिंहासनासाठी १ कोटी, तर शूर्पणखेच्या रथासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Movie: बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित आणि भव्य चित्रपटांपैकी एक असलेल्या रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे एकूण बजेट अंदाजे ४ हजार कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील भव्य सेट आणि आकर्षक दृश्यांसाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

चित्रपटाच्या पहिल्या भागाचे बजेट सुमारे १,६०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यातील मोठा खर्च व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी (CGI) आणि प्रोडक्शन डिझाइनवर करण्यात आला आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शक रमेश अंधाळे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटातील भव्य सेट आणि काही खास गोष्टींच्या निर्मितीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तपशिलांमुळे चित्रपटाच्या निर्मितीसाठी किती मेहनत आणि खर्च करण्यात आला आहे, याचा अंदाज येतो.

रावणाच्या सोन्याच्या सिंहासनासाठी खर्च केले १ कोटी रुपये

‘रामायण’मधील रावणाचे सिंहासन हे चित्रपटातील विशेष आकर्षणांपैकी एक असणार आहे. रावणाने कुबेराकडून सिंहासन बळकावून लंकेवर विजय मिळवल्यानंतरचे दृश्य चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या दृश्यासाठी तयार करण्यात आलेल्या सिंहासनावर तब्बल चार महिने काम करण्यात आले. सुरुवातीला डिझाइननुसार सिंहासनाचे क्ले मॉडेल तयार करण्यात आले. त्यानंतर फायबरचा वापर करून प्रत्यक्ष सिंहासन बनवण्यात आले.

विशेष म्हणजे, हे सिंहासन खऱ्या सोन्याप्रमाणे दिसावे यासाठी त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला. कला दिग्दर्शक रमेश अंधाळे यांच्या माहितीनुसार, हे भव्य सिंहासन तयार करण्यासाठी जवळपास १ कोटी रुपये खर्च आला आहे. त्यामुळे चित्रपटातील रावणाच्या सिंहासनाची सध्या विशेष चर्चा रंगली आहे.

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार

शूर्पणखेच्या रथासाठी दीड कोटी रुपये खर्च

चित्रपटातील आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे शूर्पणखेचा रथ. राकुल प्रीत सिंग ही चित्रपटात शूर्पणखेची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, रावणाच्या सिंहासनापेक्षाही शूर्पणखेचा रथ तयार करण्यासाठी अधिक खर्च करण्यात आला आहे. या रथाच्या निर्मितीसाठी अंदाजे १.५ कोटी रुपये खर्च झाले असून तो तयार करण्यासाठी तीन महिने लागले.

विशेष बाब म्हणजे, हा रथ चित्रपटातील केवळ एका दृश्यात दिसणार आहे. पंचवटीच्या जंगलात शूर्पणखा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना भेटण्यासाठी येते, त्या प्रसंगात हा रथ पाहायला मिळणार आहे. केवळ एका दृश्यासाठी निर्मात्यांनी एवढा मोठा खर्च केल्याने या भव्य निर्मितीची चर्चा होत आहे.

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत

पुष्पक विमानाच्या निर्मितीसाठी लागली सहा वर्षे

‘रामायण’मधील पुष्पक विमान हे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण असणार आहे. या विमानाच्या डिझाइन आणि निर्मितीवर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी जवळपास सहा वर्षे काम केले. हे विमान सुमारे ५० फूट रुंद असल्याचे सांगितले जाते. त्याचा आकार मोठा असल्यामुळे स्टुडिओमध्ये ते एकाच वेळी तयार करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याचे चार वेगवेगळे भाग तयार करण्यात आले. प्रत्येक भागाच्या निर्मितीसाठी अंदाजे ४० ते ५० दिवस लागले.

एकूणच, ‘रामायण’ चित्रपटातील प्रत्येक दृश्य भव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी निर्माते आणि संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली आहे. रावणाचे सोन्याचे सिंहासन, शूर्पणखेचा महागडा रथ आणि पुष्पक विमानाची निर्मिती यामुळे चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझाइनची चर्चा रंगली आहे. आता या भव्य कलाकृती मोठ्या पडद्यावर कशा दिसणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Web Title: Ramayana movie ravan throne shurpanakha chariot cost ranbir kapoor cinema ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराला धमकीचा मेल; ‘जलसा’ बंगल्याची पोलिसांकडून तपासणी
1

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराला धमकीचा मेल; ‘जलसा’ बंगल्याची पोलिसांकडून तपासणी

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत
2

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार
3

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी
4

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.