Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’साठी थिएटरमध्ये नॉनव्हेजवर बंदी? प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आदर राखण्यासाठी मोठा निर्णय!

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कोलकात्यातील SVF Cinema ने विशेष निर्णय घेतला आहे. चित्रपट सुरू असताना सभागृहात फक्त शाकाहारी पदार्थच नेता येणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2026 | 08:59 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Movie:रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘रामायण’ प्रदर्शित झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमधील क्रेझ पाहता कोलकात्यातील एका चित्रपटगृहाने घेतलेला विशेष निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘रामायण’ पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहातील सभागृहात केवळ शाकाहारी खाद्यपदार्थच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रेक्षकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धांचा आदर राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

‘रामायण’च्या प्रदर्शनासाठी थिएटरचा विशेष निर्णय

कोलकात्यातील एसव्हीएफ सिनेमाने रणबीर कपूरच्या ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ही विशेष व्यवस्था केली आहे. या नियमानुसार, चित्रपट सुरू असताना सभागृहात बसलेल्या प्रेक्षकांना केवळ शाकाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे, हा नियम फक्त ‘रामायण’च्या प्रदर्शनापुरताच लागू असणार आहे. इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी नेहमीप्रमाणे संपूर्ण खाद्यपदार्थांचा मेन्यू उपलब्ध असेल.

धार्मिक भावना आणि श्रद्धेचा आदर करण्यासाठी निर्णय

एसव्हीएफ सिनेमाच्या प्रवक्त्याने या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदू महाकाव्य रामायणाबद्दल असलेली लोकांची श्रद्धा आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसतात, तर ते लोकांच्या धार्मिक श्रद्धा आणि भावनांशीही जोडलेले असतात, असे कंपनीचे मत आहे.

कंपनीच्या मते, चित्रपटातील प्रसंगांदरम्यान जेव्हा हनुमान चालिसा ऐकायला मिळते, तेव्हा चित्रपटगृहातील वातावरण एखाद्या मंदिरासारखे वाटते. त्यामुळे या चित्रपटाचा अनुभव घेताना प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आदर राखला जावा, या उद्देशाने ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Sharad Kapoor: मदतीच्या नावाखाली माझी थट्टा केली! व्हिडिओसाठी पैसे दिले अन् परत घेतले; शरद कपूरचा संताप

मांसाहारी पदार्थांवर पूर्ण बंदी नाही!

दरम्यान, चित्रपटगृहाने या निर्णयाबाबत एक महत्त्वाची बाबही स्पष्ट केली आहे. या निर्णयाचा अर्थ मांसाहारी खाद्यपदार्थांवर संपूर्ण बंदी असा नाही. प्रेक्षक पूर्वीप्रमाणेच चित्रपटगृहाबाहेरील फूड काउंटरवरून मांसाहारी पदार्थ खरेदी करू शकतात. मात्र, ‘रामायण’ चित्रपट पाहताना सभागृहात मांसाहारी खाद्यपदार्थ नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

इतर चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान खाद्यपदार्थ आणि पेयांबाबतचे नेहमीचे नियम लागू राहतील. त्यामुळे हा निर्णय केवळ ‘रामायण’च्या प्रदर्शनापुरता मर्यादित आहे. चित्रपटाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे.

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज

Web Title: Ranbir kapoor ramayana movie kolkata theatre vegetarian food rule ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • bollywood Flim
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज
1

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?
2

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!
3

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार
4

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.