Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raveena Tandon : कुत्र्याला हात लावायला गेली अन्…, थोडक्यात बचावली रवीना टंडन, व्हिडिओ व्हायरल

Raveena Tandon Video: मुंबईतील 'ओह माय डॉग'च्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान रवीना टंडनच्या ड्रेसची दोरी एका कुत्र्याने पकडली. या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्रीने स्पष्टीकरण देत नेमकं काय घडलं ते सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 11:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कुत्र्याने पकडली ड्रेसची दोरी; थोडक्यात बचावली रवीना टंडन
  • रेड कार्पेटवर घडला अनपेक्षित प्रकार
  • आज प्रदर्शित झाला ‘ओह माय डॉग’
Raveena Tandon Video: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘ओह माय डॉग’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. रेड कार्पेटवर फोटोसाठी पोझ देत असताना एका कुत्र्याने अचानक तिच्या ड्रेसची दोरी दातांनी पकडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यानंतर रवीनाने स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

रेड कार्पेटवर घडला अनपेक्षित प्रकार

गुरुवारी रात्री मुंबईत झालेल्या ‘ओह माय डॉग’च्या स्पेशल स्क्रीनिंगला रवीना टंडन उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान ती एका कुत्र्यासोबत प्रेमाने संवाद साधताना आणि पापाराझींसाठी त्याच्यासोबत पोझ देताना दिसली.

The Paradise Teaser: 20 कोटी व्ह्यूजनंतर ‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज; नानीचा दमदार अंदाज पुन्हा चर्चेत

मात्र, रवीना एकटी फोटोसाठी उभी राहिल्यानंतर अचानक कुत्र्याचे लक्ष तिच्या पिवळ्या ड्रेसवरील लटकणाऱ्या दोरीकडे गेले. त्याने भुंकत ती दोरी दातांनी पकडली. काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, मात्र सुदैवाने रवीना कोणत्याही दुखापतीशिवाय बचावली.

रवीनाने राखला संयम

या संपूर्ण प्रसंगात रवीना टंडनने घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळली. तिचा संयम पाहून प्रशिक्षकांनी तात्काळ कुत्र्याला नियंत्रणात आणले. विशेष म्हणजे, प्रसंग शांत झाल्यानंतर रवीनाने पुन्हा त्या कुत्र्याला प्रेमाने कुरवाळले आणि तिच्या प्राणिप्रेमी स्वभावाची झलक दाखवली.

व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण

घटनेनंतर पापाराझींशी बोलताना रवीना टंडनने स्पष्ट केले की, कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला नव्हता. तिच्या म्हणण्यानुसार, रेड कार्पेटवर दुसरा कुत्रा दिसल्याने तो उत्साहित झाला होता आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याने ड्रेसची दोरी पकडली. मला इजा करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता, असेही तिने स्पष्ट केले.

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

प्राणिप्रेमासाठी ओळखली जाते रवीना

रवीना टंडन ही प्राणी हक्क आणि प्राणी कल्याणासाठी कायम आवाज उठवत आली आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करताना दिसते. यावर्षीच्या सुरुवातीला मुसळधार पावसात महामार्गावर अडकलेल्या एका कुत्र्याला तिने स्वतःच्या गाडीतून सुरक्षितपणे प्राणी कल्याण केंद्रात पोहोचवले होते. त्यामुळे या प्रसंगानंतरही तिने दाखवलेला संयम आणि प्राण्यांविषयीचा जिव्हाळा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आज प्रदर्शित झाला ‘ओह माय डॉग’

अमित राय लिखित आणि दिग्दर्शित ‘ओह माय डॉग’ हा चित्रपट आज, ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. एका हुशार आणि निर्भीड कुत्र्याच्या माध्यमातून मोठे रॅकेट उघडकीस आणणारी ही कथा असून, चित्रपटात पंकज त्रिपाठी, पवन मल्होत्रा, माही राय, राजेश कुमार, गीता अग्रवाल, विजय मिश्रा, श्रीधर दुबे, बुलू कुमार आणि सुलक्षणा बरुआ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

Web Title: Raveena tandon safe from dog attack at oh my dog premiere mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Dog
  • Entertainemnt News
  • Raveena Tandon

संबंधित बातम्या

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!
1

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
2

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा
3

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
4

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.