Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

अभिनेत्री सान्वी तलवारने अभिनेता करण कुंद्रावर जबरदस्ती किस केल्याचा, कानाखाली मारल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अनेक वर्षांनंतर दिलेल्या मुलाखतीत तिने संपूर्ण घटनेचा खुलासा केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 24, 2026 | 03:48 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Saanvie Tallwar: टेलिव्हिजन अभिनेत्री सान्वी तलवार हिने अभिनेता करण कुंद्रावर गंभीर आरोप करत अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे. दोघांनी ‘ये कहाँ आ गये हम’ या मालिकेत एकत्र काम केले होते. त्या काळात त्यांच्या वादाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता एका मुलाखतीत सान्वीने त्या वादामागचं कारण सांगितलं आहे.

फिल्मबीटलाला दिलेल्या मुलाखतीत सान्वीने दावा केला की, एका रोमँटिक दृश्याच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शकाने ‘ॲक्शन’ म्हणण्यापूर्वीच करण कुंद्राने तिला जबरदस्तीने किस केले. यानंतर संतापलेल्या सान्वीने त्याला कानाखाली मारली.

सान्वी म्हणाली, “तो एक सीन होता, पण दिग्दर्शकाने अजून ‘ॲक्शन’ म्हटले नव्हते. त्याआधी करणने मला किस केलं. मी त्याला कानाखाली मारली. त्यावेळी त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही, पण काही वेळाने तो परत आला आणि त्याने मला जोरात कानाखाली मारली.”

तिने पुढे दावा केला की, “पुरुषाच्या कानाखालीचा जोर वेगळाच असतो. मी थेट जमिनीवर पडले. त्यानंतर त्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. त्या वेळी सेटवर कोणीही माझ्या बाजूने उभं राहिलं नाही.”

The India Story Review:  दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट

सान्वीच्या म्हणण्यानुसार, नंतर निर्माती एकता कपूर यांनी करण कुंद्राच्या वतीने तिची माफी मागितली आणि तिला पाठिंबा दिला. त्याचबरोबर तिने करणची त्यावेळची गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर हिलाही या घटनेची माहिती दिल्याचं सांगितलं. त्यानंतर अनुषा सेटवर येऊ लागली, असा दावा सान्वीने केला आहे.

अभिनेत्रीने आणखी आरोप करत सांगितले की, या घटनेनंतर करण कुंद्रा आणि शोच्या दिग्दर्शकामुळे सेटवरील वातावरण तिच्यासाठी टॉक्सिक बनले. स्वतःसाठी आवाज उठवल्यानंतर तिच्या अभिनय क्षमतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा दावा तिने केला. मात्र, दिग्दर्शकाचे नाव तिने उघड केले नाही.

सान्वीने असेही म्हटले की, करण कुंद्राला तिच्याबद्दल वैयक्तिक आकर्षण होते आणि ते त्याच्या वागण्यातून जाणवत होते. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही तिने सांगितले.

दरम्यान, या आरोपांवर करण कुंद्रा किंवा त्याची सध्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Kissing Controversy: किसिंग वादानंतर अभिजीत भट्टाचार्यांनी उदित नारायण यांना दिला होता खास सल्ला; वर्षभरानंतर केला मोठा खुलासा

कोण आहे सान्वी तलवार?
सान्वी तलवार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि लेखिका आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने लेखिका म्हणून काम केले असून ‘फियर फाइल्स: डर की सच्ची तस्वीर’, ‘सीआयडी’ आणि ‘सुपरकॉप्स वर्सेस सुपरव्हिलन्स’ यांसारख्या मालिकांसाठी लेखन केले आहे. 2012 मध्ये ‘अर्जुन’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘कबूल है’, ‘चंद्रनंदिनी’, ‘सुफियाना प्यार मेरा’, ‘शिव शक्ती: तप त्याग तांडव’ आणि ‘ये कहाँ आ गये हम’ यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली.

Web Title: Saanvie tallwar he forcefully kissed me and slapped me actress levels serious allegations against karan kundrra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • karan kundra
  • Television Actress

संबंधित बातम्या

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
1

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
2

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
3

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी
4

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.