Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूच्या पारंपरिक डोहाळे जेवणाचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पिवळ्या सिल्क साडीत सामंथाचा सुंदर पारंपरिक लूक चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 10:20 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील खास टप्प्याचा आनंद घेत आहे. पती आणि दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत ती आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सामंथाने सोशल मीडियावर तिच्या पारंपरिक डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे काही सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या झलक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या खास सोहळ्यातील काही क्षण शेअर केले. यामध्ये पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या विविध धार्मिक विधींची झलक पाहायला मिळते. ‘कला आवरण’ (श्री कल्पम), अभिषेक आणि इतर विधी या सोहळ्यात पार पडले. या खास प्रसंगी सामंथा सरसोंच्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसली.

शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सामंथावर पवित्र जलाचा अभिषेक केला जात असून, त्याचवेळी मंत्रोच्चार सुरू असल्याचं दिसत आहे. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी हे विधी करण्यात आल्याचं सामंथाने सांगितलं आहे.

पिवळ्या साडीतील सामंथाचा सुंदर लूक

सोहळ्यादरम्यान सामंथाने आपला पोशाखही बदलला. यानंतर ती पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीत दिसली. पारंपरिक दागिने आणि साध्या, मोहक अंदाजात सामंथाचा हा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

या पारंपरिक सोहळ्याचं महत्त्व सांगताना सामंथाने म्हटलं की, ती नेहमीच भारतीय परंपरांचा आदर करत आली आहे. प्रत्येक विधीचा अर्थ आपल्याला माहीत असेलच असं नाही, मात्र जुन्या परंपरा, मंत्र आणि त्यांचे उच्चार यामागे खोल आध्यात्मिक अर्थ असल्याचा तिचा विश्वास आहे.

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

सामंथाने सांगितलं ‘कला आवरण’चं महत्त्व

सामंथाच्या म्हणण्यानुसार,ओटीभरणाच्या वेळी श्रीविद्या परंपरेतील एका पुजाऱ्याने तिला प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगितला. त्यामुळे प्रत्येक मंत्र, अर्पण आणि विधीमागे एक विशिष्ट उद्देश असल्याचं तिला समजलं.

यातील ‘कला आवरण’ (श्री कल्पम) हा श्रीविद्या परंपरेतील विशेष विधी असल्याचं सामंथाने सांगितलं. या विधीमध्ये होणाऱ्या आईच्या सात चक्रांद्वारे देवीच्या ९४ कलांचा किंवा दैवी गुणांचा सन्मान केला जातो, अशी तिची माहिती आहे. पवित्र जल आणि मंत्रांच्या माध्यमातून होणाऱ्या आईच्या चक्रांचं शुद्धीकरण, ऊर्जावर्धन आणि आध्यात्मिक आशीर्वादासाठी हा विधी केला जातो.

या विधीची सर्वात खास गोष्ट म्हणजे होणाऱ्या आईला देवीचा दर्जा दिला जातो, असं सामंथाने सांगितलं. त्यामुळे तिच्यासाठी हा पारंपरिक सोहळा अत्यंत खास आणि आध्यात्मिक अनुभव ठरला.

सामंथाने शेअर केलेले हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, चाहत्यांकडून तिच्या पारंपरिक लूकचं आणि या खास सोहळ्याचं कौतुक केलं जात आहे.

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक

Web Title: Samantha ruth prabhu baby shower photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • pregnancy
  • samantha ruth prabhu

संबंधित बातम्या

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
1

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट
2

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!
3

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!

Prasad Oak Award:  प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक
4

Prasad Oak Award: प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.