
Ranbir Kapoor's Ramayana Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
रणबीर कपूरचा ‘रामायण’ सिनेमा आला आहे. थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होतेय. सिनेमाने चांगली कमाई पण केलीय. पण ‘रामायणा’सारखा भव्य विषय फक्त तीन तासाच्या सिनेमात दाखवणं सोपं नाही. भावना, व्यक्तिरेखेची प्रतिष्ठा आणि पौराणिक काळ मोठ्या पडद्यावर दाखवणं खूप अवघड काम आहे. काही ठिकाणी निर्माते आणि दिग्दर्शक यात यशस्वी झाले आहेत. पण काही ठिकाणी त्यांनी गंभीर चुका केल्या आहेत. या चुका अशा आहेत की, ज्या गोष्टी मूळ कथेच्या आत्म्याशी जोडलेल्या आहेत, त्याच गोष्टी त्यातून गायब झाल्यात. Ranbir Kapoor‘s Ramayana Movie:
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमा बघताना अनेक ठिकाणी असं वाटतं, निर्मात्यांनी CGI आणि व्हिज्युअल्सच्या नादात कहाणीच्या महत्त्वाच्या गोष्टीच सोडून दिल्या आहेत. सिनेमातल्या अनेक व्यक्तिरेखांचे चेहरे आणि लूक बघितले तर त्यात टेक्नॉलॉजी प्रमाणापेक्षा जास्त वापरलीय असं वाटतं. काही व्यक्तिरेखा तर कार्टून वाटतायत. काहींचे हावभाव आणि संवाद यांचा मेळच बसत नाहीये.
रामायणात रावण हा फक्त एक शक्तीशाली राजा आणि खलनायक नाही. तो महादेवाचा निस्सीम भक्त आहे. महादेवाची कठोर तपस्या करणारा, महादेवाला समर्पित भावनेने पूजा करणारा राजा म्हणून रावणाकडे बघितलं जातं. पण सिनेमात रावणाची ही बाजूच आलेली नाही.या सिनेमात ब्रह्मा आणि विष्णूचं दर्शन होतं. पण रावण आणि महादेवाचा संबंध पाहिजे तसा प्रभावशाली पद्धतीने मांडला गेलेला नाही. महादेव भक्ती ही रावणाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट होती, तीच या सिनेमातून गायब आहे. ही खरंच मोठी चूक आहे.
कोणताही ऐतिहासिक किंवा पौराणिक सिनेमा बनवताना त्यातली पात्रं जिवंत वाटली पाहिजेत. छोटी भूमिका असली तरी तिला न्याय दिला पाहिजे. पण रामायणमध्ये कुंभकर्णाची व्यक्तिरेखा एकदम विचित्र पद्धतीने दाखवली गेलीय.कुंभकर्णाची भूमिका फैजल मलिकने केलीय. पण त्याचा लूक गंभीर दिसण्याऐवजी कॉमेडी दिसतोय. जणू काही आपण कुंभकर्णाच्या रूपात कार्टून बघतोय की काय, असं वाटतं. कुंभकर्ण हे रामायणातलं विशाल आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होतं. ती छाप या सिनेमात दिसत नाही.
राम, सीता आणि लक्ष्मण जंगलात राक्षसांशी लढताना दाखवले आहेत. हे दृश्य एकदम प्रभावहीन झालंय. तिन्ही पात्रं जंगलात पळताना दिसतायत. त्यांच्या मागे राक्षसांचं सैन्य दिसतंय. या संपूर्ण अॅक्शन सीनमध्ये वास्तवता दिसत नाही.राक्षसांचा लूक आणि त्यांच्याशी होणारी लढाई एकदम नकली वाटते. हे दृश्य हस्यास्पद झालंय. समर प्रसंग असतो तेव्हा भीती आणि रोमांच उभा राहिला पाहिजे. पण यात CGI ची बनावटगिरी दिसतेय.
या सिनेमात कैकयी वगळता दशरथांच्या इतर सगळ्या राण्यांकडे दुर्लक्ष केलंय. त्या राण्यांच्या वाट्याला काहीच महत्त्वाचे संवाद नाहीत. महत्त्वाच्या भूमिका पण नाहीत. त्या फक्त स्क्रीनवर हसताना दिसतायत.फक्त राजमहालाची भव्यता दाखवण्यासाठीच या राण्यांना ठेवलंय की काय, असं वाटतं. या सिनेमात या राण्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या भावभावना दाखवायला हव्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
या सिनेमात रकुल प्रीतने शूर्पणखाची भूमिका केलीय. या सिनेमातला तिचा लूक आणि तिची उपस्थिती खटकते. शूर्पणखेला राक्षसीण दाखवण्याऐवजी तिला ग्लॅमरस अंदाजात जास्त दाखवलंय. संपूर्ण सिनेमात तिचा राक्षसी अवतार दिसत नाही. सिनेमात ती ग्लॅम डॉल वाटते.संपूर्ण रामायण जे घडलं त्याला कारणीभूत शूर्पणखा आहे. त्यामुळे तिचं कॅरेक्टर यात अत्यंत महत्त्वाचं आहे. पण तिला पाहिजे तसं प्रभावशाली दाखवलं नाही.एकंदरीत सिनेमा कमाई करतोय, पण मूळ रामायणाची भावना त्यातून हरवलीय असं अनेकांना वाटतंय. तुम्ही सिनेमा बघितलात का? तुम्हाला काय वाटलं?