Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समर्थ रामदासांच्या विचारांचा जागर, ‘समर्थ’चा फर्स्ट लुक चर्चेत; अडीच हजार विद्यार्थ्यांसमोर पोस्टरचे भव्य अनावरण

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आगामी ‘समर्थ’ चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण करण्यात आले. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आधुनिक मानवंदना देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 24, 2026 | 04:21 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची नव्या पिढीशी सांगड घालण्याचा अनोखा प्रयत्न म्हणून आगामी ‘समर्थ’ चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण पुण्यात करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत पार पडलेल्या या कार्यक्रमात तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत समर्थ विचारांना मानवंदना दिली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोपासना आणि बलोपासनेच्या प्रात्यक्षिकांनी झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचा गौरव केला. ‘मनाचे श्लोक’मधील निवडक श्लोकांचे सामूहिक पठण झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

या विशेष प्रसंगी ‘समर्थ’ चित्रपटाचे पोस्टर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा आधुनिक माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाला सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचे प्रमुख बाळासाहेब स्वामी, आदरणीय चंद्रतनय दादा, राजीव नगरकर, रामकथाकार आणि चित्रपटाचे कथा-संकल्पनाकार रवींद्र पाठक, दिग्दर्शक योगेश फुलफगर, क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत तसेच कलाकार पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनीस आणि हार्दिक जोशी यांची उपस्थिती लाभली.

Anushka Nikhil Wedding: ऑनस्क्रीन जोडी आता रिअल लाइफमध्येही एकत्र! अखेर अनुष्का झाली निखिलची खऱ्या आयुष्यातील कारभारीण

चित्रपटाचे कथा-संकल्पनाकार रवींद्र पाठक यांनी सांगितले की, समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. शिस्त, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि सामर्थ्याचा संदेश देणाऱ्या या विचारांची ओळख नव्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न ‘समर्थ’मधून करण्यात येत आहे.

दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट समर्थ रामदास स्वामींचा चरित्रपट नसून त्यांच्या विचारांवर आधारित एक व्यावसायिक आणि मनोरंजनप्रधान चित्रपट आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आजच्या युवकांना आणि समाजाला कसा फायदा होऊ शकतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

Prakash Raj Voter List Controversy: प्रकाश राज वादाच्या भोवऱ्यात; 3 राज्यांच्या मतदार यादीत नाव आढळल्याने न्यायालयाची गंभीर दखल

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, समर्थ विचारांचा आधुनिक संदर्भातील हा प्रवास प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Samarth ramdas legacy celebrated as samarth first look creates buzz grand poster unveiled before 2500 students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Actress Video Viral: धक्कादायक! घशात अडकली नोज रिंग, शूटिंगदरम्यान अचानक बिघडली अभिनेत्रीची तब्येत; सेटवर नेमकं काय घडलं
1

Actress Video Viral: धक्कादायक! घशात अडकली नोज रिंग, शूटिंगदरम्यान अचानक बिघडली अभिनेत्रीची तब्येत; सेटवर नेमकं काय घडलं

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा
2

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

Nikita Rawal Kiss Controversy: फॅनने अचानक केलं लिप-लॉक किस;अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया
3

Nikita Rawal Kiss Controversy: फॅनने अचानक केलं लिप-लॉक किस;अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप
4

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.