Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि ओंकार भोजने यांच्यात वादाची चर्चा आहे. कवडेंच्या आरोपांवर ओंकारने आता प्रतिक्रिया दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  •  ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद
  • मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया
  • काय म्हणाला अभिनेता ओंकार भोजने?
Onkar Bhojane On Milind Kawde: मराठी अभिनेता ओंकार भोजने सध्या ‘अफरातफरी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनवरून सध्या ओंकार आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्यातील मतभेद चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रमोशनल इव्हेंटला ओंकार गैरहजर राहिल्यामुळे मिलिंद कवडे यांनी एका मुलाखतीत त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता या आरोपांवर ओंकार भोजनेने आपली बाजू मांडली आहे.

‘अफरातफरी’चे दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि त्यांची टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत त्यांनी ओंकारच्या प्रमोशनमधील सहभागाबाबत नाराजी व्यक्त केली. ओंकारकडून फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा करत त्यांनी त्याच्या व्यावसायिक वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले.

“मी प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार”

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी संवाद साधला. तो म्हणाला, “मी यापुढे सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. मी त्यांच्या टीमसोबत, ईपींसोबत संपर्कात आहे. दिग्दर्शक असं का म्हणाले हे मला माहिती नाही, पण यावर मी नक्कीच उत्तर देईन.”

ओंकारच्या या वक्तव्यानंतर ‘अफरातफरी’च्या प्रमोशनमध्ये तो सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, दिग्दर्शकांनी केलेल्या आरोपांवर तो सविस्तर काय उत्तर देतो, याकडे आता लक्ष लागले आहे.Onkar Bhojane On Milind Kawde

मिलिंद कवडेंचा ओंकारवर आरोप

दरम्यान, मिलिंद कवडे यांनी मुलाखतीत दावा केला की, ओंकारला जून महिन्यातच चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर प्रमोशनसाठी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे कवडे यांनी सांगितले.

“ओंकार एवढा बिझी आहे की तो कोणाचेही फोन उचलत नाही. आम्हा तिघांचेही त्याने फोन उचलले नाहीत. कॉल केल्यानंतर त्याचा एकच मेसेज येतो, ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो.’ गेल्या चार महिन्यांपासून हेच सुरू आहे,” असं मिलिंद कवडे यांनी सांगितलं.

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

“पुढच्या चित्रपटात ओंकारला घेणार नाही”

या अनुभवामुळे भविष्यातील चित्रपटांमध्ये ओंकारसोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याचेही मिलिंद कवडे यांनी स्पष्ट केले.

“आता मी कानाला खडा लावला आहे. मी पुढच्या चित्रपटात ओंकारला अजिबात घेणार नाही. मी आतापर्यंत खूप काम केलं आहे, पण या सगळ्यात तो खूप अनप्रोफेशनल आहे. दिग्दर्शकाचा फोन न उचलणं, निर्मात्यांचा फोन न उचलणं, EP ला गंडवणं आणि सतत येतो-येतो म्हणणं… याला अनप्रोफेशनलच म्हणतात,” असा दावा कवडे यांनी केला.

दरम्यान, ओंकारने आपण चित्रपटाच्या टीमच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या वक्तव्यांमुळे ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून सुरू झालेला हा वाद सध्या चर्चेत आहे..

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Web Title: Onkar bhojane on milind kawde afratafari promotion controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
1

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
4

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.