Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhavna Seth: बाप्पाच्या आगमनासोबत घरातला ‘तो’ आनंदही झाला पूर्ण; संभावनाने दाखवले जुळ्या मुलांचे चेहरे

Sambhavna Seth Twins: १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आई झालेल्या संभावनाने गणेशोत्सवात जुळ्या मुलांचा फेस रिव्हील केला. ध्वजा आणि युगार्थची पहिली झलक चाहत्यांना दाखवली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 16, 2026 | 10:30 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Sambhavna Seth: अभिनेत्री संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव खास ठरला आहे. घरात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर या जोडप्याने आपल्या आयुष्यातील आणखी एक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. जवळपास  १० वर्षांनंतर त्यांना बाळ झाले आहे. पालकत्वाच्या प्रतीक्षेनंतर आयुष्यात आलेल्या जुळ्या मुलांचा चेहरा संभावनाने पहिल्यांदाच चाहत्यांना दाखवला आहे.

संभावना आणि अविनाश यांनी आपल्या यूट्यूब व्लॉगमध्ये मुलांचा फेस रिव्हील केला. गणपती बाप्पाच्या जयघोषात दोन्ही मुलांना चाहत्यांसमोर आणण्यात आलं. या खास क्षणी संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होतं. मुलांचा फोटोशूटही यावेळी करण्यात आला.

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात चेहरा दाखवला

घरात बाप्पा विराजमान झालेले असताना मुलांचा फेस रिव्हील करण्याचा निर्णय संभावनाने आणि अविनाशने घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत त्यांनी दोन्ही मुलांचे चेहरे चाहत्यांना दाखवले. या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भावुकता व्लॉगमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते.

संभावना आणि अविनाश यांनी आपल्या मुलांची नावंही खास ठेवली आहेत. मुलाचं नाव युगार्थ, तर मुलीचं नाव ध्वजाह आहे.

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

मुलांच्या जन्माचे भावुक क्षणही व्लॉगमध्ये

फेस रिव्हीलसोबतच या व्लॉगमध्ये मुलांच्या जन्माच्या वेळचे रुग्णालयातील काही खास क्षणही पाहायला मिळाले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुलांना पहिल्यांदा जवळ घेतानाचे क्षण दोघांसाठीही अत्यंत भावनिक होते.

संभावनाने तिच्या पालकत्वाच्या प्रवासातील अनेक चढ-उतार यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामुळे मुलांच्या फेस रिव्हीलची चाहत्यांनाही उत्सुकता होती.

सात IVF सायकल्सनंतरही सुरू होता प्रयत्न

संभावना सेठने यापूर्वी एका टीव्ही शोमध्ये आपल्या फर्टिलिटी जर्नीबद्दल खुलासा केला होता. लग्नाआधीच तिने आणि अविनाशने एम्ब्रियो फ्रीज केले होते. भविष्यात बाळाचं नियोजन केल्यानंतर सगळं सहज होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

एम्ब्रियो ट्रान्सफरच्या अनेक प्रयत्नांनंतरही यश मिळालं नाही. त्यानंतर IVFच्या माध्यमातूनही त्यांनी प्रयत्न केले. संभावनाने सांगितल्यानुसार, ती एकूण सात IVF सायकल्समधून गेली. या प्रवासात तिला मिसकॅरेजचाही सामना करावा लागला.

Tumbbad Movie: ‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज

जूनमध्ये झाले आई-बाबा

अखेर ४ जून २०२६ रोजी संभावना आणि अविनाश यांनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचं स्वागत केलं. त्यांच्या घरी एक मुलगा आणि एक मुलगी आली. जवळपास दहा वर्षांच्या या प्रवासानंतर दोघांचं पालक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

आता गणपती बाप्पाच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे चेहरे जगासमोर आणले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या कुटुंबासाठी आणखी खास आणि अविस्मरणीय ठरला आहे.

Web Title: Sambhavna seth twins baby face reveal yugarth dhwajah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

गाण्यांनंतर आता अभिनयात धडक! लोकप्रिय गायिका Pragati Nagpal ची मोठ्या पडद्यावर एन्ट्री; ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून पदार्पण
1

गाण्यांनंतर आता अभिनयात धडक! लोकप्रिय गायिका Pragati Nagpal ची मोठ्या पडद्यावर एन्ट्री; ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून पदार्पण

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट
2

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.