Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

Sanjay Dutt Marathi Controversy: दहीहंडी कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला मराठीत बोलण्यास सांगितले. यावर संजय दत्तने येरवडा तुरुंगाचा संदर्भ देत मिश्कील उत्तर दिलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 07, 2026 | 02:59 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • संजय दत्तने मराठीत बोलण्यास का दिला नकार?
  • प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय सांगितलं?
  • संजय दत्तच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा
Sanjay Dutt Marathi Controversy: महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू असलेल्या चर्चेला आता अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे नवं वळण मिळालं आहे. दहीहंडीच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला मराठीत बोलण्याची विनंती केली. मात्र, संजय दत्तने मिश्कीलपणे उत्तर देत ही विनंती टाळली. “मी सहा वर्षे येरवडा तुरुंगात होतो, तरीही मराठी शिकता आली नाही. थोडीफार शिकलो होतो,” असं तो म्हणाला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमकं काय घडलं?

ठाण्यात प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्त उपस्थित होता. यावेळी अभिनेता हिंदीत बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी त्याला मराठीत बोलण्याची विनंती केली. “आजकाल मी सगळ्यांना मराठी शिकवत आहे,” असं म्हणत त्यांनी संजय दत्तला मराठीत संवाद साधण्यास सांगितलं.

यानंतर संजय दत्तने माईक हातात घेत “हर हर महादेव”चा जयघोष केला आणि आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. “प्रताप भाई, मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये होतो. तेव्हाही मराठी शिकता आली नाही. थोडीफार शिकलो होतो,” असं तो म्हणाला. त्यानंतर त्याने मराठीत उपस्थितांना नमस्कारही केला.

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार

संजय दत्तने सांगितलं २५ वर्षांचं नातं

या प्रसंगानंतर संजय दत्तने प्रताप सरनाईक यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीचाही उल्लेख केला. “मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी प्रताप भाईंचा आभारी आहे. आमचं नातं खूप जुनं आहे, जवळपास २५ वर्षांचं आहे,” असं त्याने सांगितलं. त्यामुळे त्याचं मराठीबाबतचं वक्तव्य हे प्रामुख्याने मिश्कील अंदाजात केलेलं असल्याचं कार्यक्रमातील वातावरणावरून दिसून आलं.

मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा चर्चा

संजय दत्तच्या या वक्तव्याची चर्चा अशा वेळी होत आहे, जेव्हा महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरतं मराठीचं ज्ञान असण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. परिवहन विभागाच्या या भूमिकेमुळे भाषेच्या सक्तीवरून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर संजय दत्तने मंत्र्यांसमोरच मराठी बोलण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर या घटनेची चर्चा रंगली आहे. काही युजर्सनी संजय दत्तच्या विनोदी उत्तराचं समर्थन केलं, तर काहींनी या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओवर काही युजर्सनी संजय दत्तने मंत्र्यांच्या विनंतीला मिश्कीलपणे उत्तर दिल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीच्या नियमाचा संदर्भ देत या घटनेतील विरोधाभासावर प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, या घटनेवर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी संजय दत्तच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ मनोरंजनविश्वापुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचाही भाग बनला आहे.

संजय दत्तचं हे वक्तव्य विनोदी स्वरूपाचं असलं, तरी महाराष्ट्रातील मराठी भाषा आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या नियमाच्या पार्श्वभूमीवर त्याची चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे.

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण

Web Title: Sanjay dutt marathi controversy pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Pratap Sarnaiik
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार
1

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?
2

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज
3

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण
4

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.