Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार

Sayani Gupta: सयानी गुप्ता ‘आर्या’ या अमेरिकन फीचर फिल्ममधून पदार्पण करत आहे. रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सनसोबत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 11, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sayani Gupta: अभिनेत्री सयानी गुप्तासाठी हे वर्ष नव्या प्रोजेक्ट्सनी भरलेलं आहे. ‘आसमानी’ या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या लघुपटाला जागतिक स्तरावर कौतुक मिळत असतानाच आता सयानीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. सयानी अमेरिकन फीचर फिल्म ‘आर्या’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘रिव्हरडेल’ आणि ‘13 Reasons Why’ फेम रॉस बटलर तसेच ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’ फेम मार्क इव्हान जॅक्सन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सनसोबत दिसणार सयानी

नील तुली लिखित आणि दिग्दर्शित ‘आर्या’मध्ये सयानी एका प्रतिष्ठित भारतीय संगीत संस्थेतील शिस्तप्रिय पियानो शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन यांच्यासोबत अर्जुन गुप्ता, आदी रॉय, कायरा लेरॉक्स आणि इक्बाल थेबा हे कलाकारही दिसणार आहेत.

विशेष म्हणजे, ‘आर्या’मधून सयानी अमेरिकन स्वतंत्र निर्मिती असलेल्या फीचर फिल्ममध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे.

Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज

काय आहे ‘आर्या’ची कथा?

‘आर्या’मध्ये सयानीची व्यक्तिरेखा एका कामासाठी अनिच्छेने उत्तर मिनेसोटा येथे जाते. तिथे एका अडचणीत सापडलेल्या बँड प्रोग्रामला सावरण्याची जबाबदारी तिच्यावर येते. त्याच वेळी भारतात आपल्या करिअरच्या महत्त्वाकांक्षांना पुढे नेण्याचं आव्हानही तिच्यासमोर असतं.

मात्र, उत्तर मिनेसोटामध्ये पोहोचल्यानंतर परिस्थिती वेगळं वळण घेते. काही गोंधळ निर्माण झाल्यानंतर तिला स्वतःच्या वैयक्तिक असुरक्षिततेचाही सामना करावा लागतो. त्यामुळे ‘आर्या’ ही केवळ एका संगीत शिक्षिकेची गोष्ट न राहता तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाची कहाणी ठरते.

सयानी कार्यकारी निर्मातीचीही जबाबदारी सांभाळणार

‘आर्या’मध्ये मुख्य भूमिका साकारण्यासोबतच सयानी कार्यकारी निर्माती म्हणूनही काम पाहत आहे. विशेष म्हणजे, रॉस बटलरही या चित्रपटासाठी कार्यकारी निर्माते म्हणून जोडले गेले आहेत.

नील तुली यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून ‘आर्या’ हा त्यांचा फीचर फिल्ममधील दिग्दर्शकीय पदार्पणाचा प्रोजेक्ट आहे.

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन

‘आसमानी’च्या यशानंतर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट

सयानी गुप्ताने अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. तिच्या ‘आसमानी’ या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या लघुपटाचं लेखन आणि निर्मितीही तिने केली आहे. या लघुपटाला जागतिक स्तरावरील विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक मिळत आहे.

वॉशिंग्टन डीसीपासून टोकियो आणि केरळपर्यंत ‘आसमानी’चा महोत्सवी प्रवास सुरू असतानाच सयानी आता ‘आर्या’मधून अमेरिकन चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत सयानी गुप्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे.

Web Title: Sayani gupta aarya american film ross butler mark evan jackson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?
1

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.