Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shanta Shelke Birth Anniversary : शांता शेळके यांच्या अजरामर गीतांची मुंबईत सुरेल मैफल; ‘शब्द सुरांचे चांदणे’ कार्यक्रमाचे आयोजन

Shanta Shelke Birth Anniversary : ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जयंतीनिमित्त रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ‘शब्द सुरांचे चांदणे’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 09, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘शब्द सुरांचे चांदणे’ या कार्यक्रमातून आदरांजली अर्पण  
  • मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा  
  • पुढील पिढीपर्यंत प्रसारण करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम   
Shanta Shelke Birth Anniversary : ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी शब्दबद्ध केलेल्या अजरामर गीतांना स्वररूप देणारी ‘शब्द सुरांचे चांदणे’ ही विशेष संगीत मैफल रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘शब्द सुरांचे चांदणे’ या कार्यक्रमातून आदरांजली अर्पण

शांता शेळके यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांनी मराठी भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या शब्दांमधील भावस्पर्शी संवेदना, निसर्ग, प्रेम, भक्ती आणि जीवनानुभव यांना लाभलेली सुरेल चाल यामुळे ही गीते आजही रसिकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शब्द सुरांचे चांदणे’ या कार्यक्रमातून त्यांच्या अजरामर गीतांना संगीतबद्ध स्वरूपात आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून  शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही जागा राखीव आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘शब्द सुरांचे चांदणे’ या शांता शेळके यांच्या अजरामर गीतांच्या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

पुढील पिढीपर्यंत प्रसारण करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम 

या मैफलीत नचिकेत देसाई, धनंजय म्हसकर, केतकी चैतन्य आणि धनश्री देशपांडे हे गायक कलाकार शांता शेळके यांच्या शब्दांतील लोकप्रिय गीते सादर करणार आहेत. अनघा मोडक निवेदिका म्हणून कार्यक्रमाची सूत्रे सांभाळणार आहेत.

कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून, वाद्यसाथीसाठी प्रशांत लळित, दर्शना जोग, प्रणव हरिदास, सूर्यकांत सुर्वे, प्रभाकर मोसंबकर आणि अभिजित सावंत सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रूपक संजीव लेले आणि राहुल शशिकांत भावे यांची आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अजरामर कलाकृतींचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत प्रसारण करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Sai Paranjpye : साहित्य, नाटक ते चित्रपट; सई परांजपे यांच्या कलाप्रवासाचा होणार गौरव, ५८ वा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जाहीर 

Web Title: Shanta shelke birth anniversary shabd suranchandane mumbai concert 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • akhil bhartiya marathi sahitya sammelan
  • maharshtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.