Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharat Saxena: उभं राहून MRI करणाऱ्या शरत सक्सेनांचे फोटो चर्चेत; सर्जरीपूर्वी चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Sharat Saxena Health: ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांनी लंबर स्पाइनच्या शस्त्रक्रियेपूर्वी MRIचे चार फोटो शेअर केले. चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 10, 2026 | 12:50 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शस्त्रक्रियेपूर्वी शरत सक्सेनांनी केली MRI; चार फोटो व्हायरल
  • ‘पुन्हा व्यवस्थित चालता यावं आणि काम करता यावं’
  • २५० हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम
Sharat Saxena Health: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या MRIचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शरत सक्सेना यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, हे फोटो त्यांच्या शस्त्रक्रियेच्या अगदी आधीचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शरत सक्सेना यांनी मुंबईतील एका रुग्णालयातील MRI रूममधील चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ते उभं राहून MRI करताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनाही स्पष्टपणे जाणवत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आरोग्याबाबत चाहत्यांना माहिती दिली.

लंबर स्पाइनच्या शस्त्रक्रियेपूर्वी केली MRI

हे फोटो शेअर करताना शरत सक्सेना यांनी सांगितलं की, मुंबईतील रुग्णालयात लंबर स्पाइन म्हणजेच कंबरेच्या खालच्या भागाच्या शस्त्रक्रियेपूर्वी त्यांनी उभं राहून MRI करून घेतली. हे फोटो शस्त्रक्रियेच्या अगदी आधीचे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. अनेकांनी शरत सक्सेना लवकर बरे व्हावेत आणि त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.

‘पुन्हा व्यवस्थित चालता यावं आणि काम करता यावं’

चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांनंतर शरत सक्सेना यांनी कमेंट्सच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले. त्यांनी आशा व्यक्त केली की, शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा व्यवस्थित चालू शकतील आणि कामही करू शकतील.

शरत सक्सेना यांनी आपल्या हितचिंतकांचे आभार मानताना, ‘ज्या सर्वांनी माझ्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार. मला आशा आहे की मी पुन्हा व्यवस्थित चालू शकेन आणि काम करू शकेन. तुम्हा सर्वांचे आभार,’ असं म्हटलं आहे.

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट

२५० हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम

शरत सक्सेना यांनी आपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः ९०च्या दशकात त्यांच्या अभिनयाची आणि खलनायकी भूमिकांची मोठी चर्चा होती. त्यांनी खलनायकासोबतच विनोदी भूमिका आणि नायकाच्या वडिलांच्या भूमिकाही साकारल्या आहेत.

शरत सक्सेना यांनी आपल्या कारकिर्दीत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याचं सांगितलं जातं. नुकतेच ते अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटातही दिसले होते. आता त्यांच्या शस्त्रक्रियेपूर्वीचे फोटो समोर आल्यानंतर चाहते त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य

Web Title: Sharat saxena health mri surgery instagram photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Actor
  • Bollywood News
  • Hospital

संबंधित बातम्या

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
1

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू
2

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू

Mumbai News: वातानुकूलन यंत्रणेच्या देखभालीवर भर! पालिका रुग्णालये, शवागारांसाठी २.६६ कोटींचे कंत्राट; ‘ब्लू स्टार’ची केली निवड
3

Mumbai News: वातानुकूलन यंत्रणेच्या देखभालीवर भर! पालिका रुग्णालये, शवागारांसाठी २.६६ कोटींचे कंत्राट; ‘ब्लू स्टार’ची केली निवड

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन
4

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.