Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shilpa Thakre चा धाडसी निर्णय, नायिकेच्या भूमिकेनंतर साकारणार खलनायिका

शिल्पा ठाकरेने आतापर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत. मात्र ती प्रेक्षकांसमोर नेहमीच नायिकेच्या आणि सकारात्मक भूमिकेत आली आहे. पण आता तिने धाडसी निर्णय घेत खलनायिकेची भूमिका स्वीकारली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 15, 2026 | 11:39 AM
शिल्पा ठाकरे दिसणार खलनायिकेच्या रूपात

शिल्पा ठाकरे दिसणार खलनायिकेच्या रूपात

Follow Us
Follow Us:
  • शिल्पा ठाकरेचा धाडसी निर्णय 
  • साकारणार इन्स्पेक्टर मंजूमध्ये खलनायिका 
  • पहिल्यांदाच साकारणार खलनायिकेची भूमिका 
मराठी मालिकांमध्ये मुख्य आणि सकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री शिल्पा ठाकरे आता करिअरमधील एक धाडसी निर्णय घेताना दिसत आहे. नायिकेची ओळख असताना शिल्पाने पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका स्वीकारली आहे. सन मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इन्स्पेक्टर मंजू’ मध्ये शिल्पा अनुष्का पाटील ही महत्त्वाची भूमिका साकारणार असून तिच्या एन्ट्रीमुळे कथानकाला मोठं वळण मिळणार आहे.

‘महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या शिल्पाने सन मराठीच्या ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. तसेच तिने ‘प्रेमा’, ‘परफ्युम’, ‘ट्रिपल सीट’, ‘खिचीक’, ‘इभ्रत’ आणि ‘भिरकीट’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं असून ‘सुम्मी’ या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये तसेच आगामी ‘द चोजन फॅमिली’ या डिजिटल प्रोजेक्टमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा

शिल्पाने व्यक्त केल्या भावना 

या नव्या भूमिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, “‘नवी जन्मेन मी’नंतर प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं आणि नेहमी सकारात्मक भूमिकांमध्ये स्वीकारलं. त्यामुळे खलनायिकेची भूमिका करायची ऑफर आली तेव्हा मी सुरुवातीला थोडी साशंक होते. प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतील का हा प्रश्न होता. पण अनुष्का ही फक्त खलनायिका नाही—तिच्यामागे खूप भावना, वेदना आणि एक मोठं रहस्य आहे. अभिनेत्री म्हणून मला स्वतःला रिपीट करायचं नव्हतं, म्हणून मी हा निर्णय घेतला.”

कथेला मिळणार वेगळं वळण 

सध्या मालिकेत मंजूची साताऱ्यात पोस्टिंग सत्याला अटक करण्यासाठी झाली होती. मात्र सत्याला अटक करण्याऐवजी ती त्याच्याच प्रेमात पडल्यामुळे कथेला वेगळंच वळण मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर अनुष्काची एन्ट्री होते. ती फक्त मंजूवर लक्ष ठेवण्यासाठी आलेली नसून तिच्या भूतकाळाशी जोडलेलं एक मोठं रहस्य आणि सूडाची भावना घेऊन आली असल्याचं समोर येत आहे. अनुष्का नेमकी कोण आहे? तिचा सत्याशी काय संबंध आहे? आणि ती मंजू-सत्या यांच्या आयुष्यात कोणतं वादळ आणणार? याची उत्तरं मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये मिळणार आहेत.

मुख्य भूमिकेनंतर साचेबद्ध भूमिका न स्वीकारता वेगळी भूमिका निवडण्याचा शिल्पाचा निर्णय तिच्या अभिनेत्री म्हणून असलेल्या आत्मविश्वासाची झलक देतो. तिचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिल्पा ठाकरेची ही नवी भूमिका प्रेक्षकांना ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत पहायला मिळणार आहे. 

Inspector Manju : “हेलिकॉप्टरमध्ये हिरो सारखी एन्ट्री ते स्फोट”, ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना दिला धक्का

Web Title: Shilpa thakre turns villain for the first time in inspector manju takes different path

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Entertainment News
  • sun marathi

संबंधित बातम्या

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
1

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
3

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
4

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.