Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!

Shruti Haasan On Periods: श्रुती हासनने मासिक पाळीच्या त्रासाबद्दल भाष्य करत पुरुषांनाही पाळी यावी अशी इच्छा व्यक्त केली. यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 21, 2026 | 10:10 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • श्रुती हासनने देवाकडे केली ही प्रार्थना
  • पुरूषांना पीरीयड्स येण्याची इच्छा केली व्यक्त
  • लग्नाबद्दलही व्यक्त केली होती भीती
Shruti Haasan on Periods :अभिनेत्री श्रुती हासन तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. वैयक्तिक आयुष्य असो किंवा महिलांशी संबंधित विषय, ती अनेकदा आपलं मत मोकळेपणाने मांडताना दिसते. नुकतंच तिने मासिक पाळी आणि त्या काळात महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगताना पीसीओएसमुळे (PCOS) तिला वेदनादायक मासिक पाळीचा त्रास होत असल्याचं म्हटलं.

श्रुतीने सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये मासिक पाळी, सेटवर काम करताना येणाऱ्या अडचणी आणि ‘पीरियड हॉलिडे’बद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली.

‘पुरुषांनाही मासिक पाळी यावी अशी हजार वेळा प्रार्थना केली’

मासिक पाळीच्या त्रासाबद्दल बोलताना श्रुतीने गंमतीच्या अंदाजात म्हटलं की, पुरुषांना महिलांना होणारा हा त्रास समजत नाही. त्यामुळे पुरुषांनाही मासिक पाळी यावी, अशी आपण हजारो वेळा देवाकडे प्रार्थना केली आहे, असं तिने सांगितलं.

तिने पुढे म्हटलं की, पुरुषांनाही मासिक पाळीचा अनुभव आला तर कामाच्या ठिकाणी ‘पीरियड हॉलिडे’चं महत्त्व त्यांना समजेल. आपल्या करारांमध्येही मासिक पाळीच्या रजेची तरतूद असावी, असं तिचं मत आहे.

सुरुवातीला सेटवर पीरियड्सबद्दल बोलण्याची भीती वाटायची

श्रुतीने सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला सेटवर मासिक पाळीबद्दल बोलण्याची भीती वाटायची. या विषयावर कोणालाही बोलायचं नसेल, असं तिला वाटायचं. मात्र, नंतर तिच्या लक्षात आलं की, आपल्याला होणारा त्रास टीमला आधीच सांगितला तर शूटिंगदरम्यान टीम त्यानुसार काम करू शकते.

सहकलाकाराच्या अनुभवातून मिळाला आत्मविश्वास

यासाठी तिने एका सहकलाकाराचा अनुभवही सांगितला. सहकलाकाराने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल टीमला सांगितल्यानंतर संपूर्ण टीमने त्याची परिस्थिती लक्षात घेऊन शूटिंगचं नियोजन केलं होतं.

हे पाहिल्यानंतर श्रुतीलाही आपल्या मासिक पाळीच्या त्रासाबद्दल मोकळेपणाने बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला. तिने दिग्दर्शकाला याबद्दल सांगितल्यावर त्यानेही आपल्या मुलीला मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं श्रुतीने सांगितलं.

‘मला पीरियड्स आले आहेत’ असं सांगायला सुरुवात केली

श्रुतीच्या म्हणण्यानुसार, आपली समस्या टीमला माहीत असेल तर ते अधिक चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकतात. त्यामुळे मासिक पाळी आली असताना ती आता ही गोष्ट लपवत नाही.

“मी काम करेन, पण मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे जर तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही अधिक पाठिंबा देऊ शकता,” अशा शब्दांत तिने आपला अनुभव सांगितला.

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद

लग्नाबद्दलही व्यक्त केली होती भीती

श्रुती हासनने याआधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने भाष्य केलं आहे. लग्नाच्या कल्पनेने आपल्याला भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं होतं. स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली असल्याने लग्नानंतर त्यावर परिणाम होईल की काय, अशी भीती असल्याचं तिने म्हटलं होतं.

मात्र, श्रुतीचा प्रेम आणि नात्यांमधील वचनबद्धतेवर विश्वास आहे. भविष्यात आई होण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. आता मासिक पाळी आणि ‘पीरियड हॉलिडे’बाबत केलेल्या तिच्या वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Web Title: Shruti haasan on periods men periods prayer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • Period Leave

संबंधित बातम्या

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
1

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा
2

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
3

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
4

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.