फोटो सौजन्य सोशल मिडिया
Kishor Kumar Song Ban :किशोर कुमार यांच्या गाण्यावर ०१ वर्षेसाठी होती हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रिद्ध गायक किशोर कुमार यांच्यावर एक वर्षांसाठी बंदी होती. आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणारा एक प्रसिद्ध गायकाला चक्क एक वर्षे बॅन करण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात म्हणजे १९७५ रोजी किशोर कुमार यांच्या गाण्यांवर सरकारी रेडिओ तसेच दूरदर्शनवर प्रर्दशित होणाऱ्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. याचा खुलासा त्यांचा मुलगा गायक अमित कुमार यांनी केला होता.
काँग्रेस सरकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आणि सरकारच्या २० कलमी कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी गाण्यास किशोर कुमार यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्या काळातील माहिती आणि प्रसारण मंत्री व्ही. सी. शुक्ला यांना गायक किशोर कुमार यांनी दिलेला नकार सहन झाला नाही. म्हणून प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांना शिक्षा म्हणून त्यांच्या संपूर्ण गाण्यांवर बंदी घालण्यात आली. जेवढी सरकारी माध्यमांमध्ये आहेत तेवढ्या माध्यमांवर बंदी घालण्यात आली.
किशोर कुमार हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे गायक आहेत.त्यांनी त्याच्या गाण्याची सुरुवात १९४८ पासून जिद्दी या चित्रपटापासून केली. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी त्यांना गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर पुढे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक गाणी दिली. किशोर कुमार यांचा अष्टपैलू आवाज त्यांच्या गायणातला जिवंतपणा आणि योडेलिंगची एक वेगळी अनोखी त्यांनी निर्माण केली होती. त्यांच्या या शैली मुळे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर आणि संगित दुनियेत अनेक दशके गाजवली.
राजेश खन्ना साठी आणि अँग्री यंगमॅन म्हणजेचं आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांनी अनेक रोमँटिक गाणी गायली. या मध्ये रूप तेरा मस्ताना (आराधना) पल पल दिल के पास (ब्लॅक मेल) ओ मेरे दिल के चैन (मेरे जीवन साथी) इवढेच नाही , पुढे त्यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी सुद्धा गाणी गायली आहेत. गंमत जमंत मधिल अश्विनी ये ना …






