Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shweta Tiwari: ‘तुकाराम मुंढेजी… तुम्ही कुठे आहात?’ श्वेता तिवारीच्या घरी थंड पेयासोबत आलं चक्क जिवंत झुरळ; व्हिडीओ व्हायरल

Shweta Tiwari: श्वेता तिवारीने इन्स्टामार्टवरून रेड बुल ऑर्डर केलं, मात्र डिलिव्हरीसोबत झुरळ घरात आल्याचा दावा केला. अभिनेत्रीने तुकाराम मुंडेंना टॅग करत VIDEO शेअर केला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 02:17 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Shweta Tiwari: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स २’मुळे चर्चेत आहे. मात्र, आता ती एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या रेड बुलच्या डिलिव्हरीसोबत चक्क एक झुरळ घरात आल्याचा दावा केला आहे. याचा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून, मजेशीर अंदाजात आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे.

रेड बुलच्या डिलिव्हरीसोबत आलं झुरळ!

श्वेता तिवारीने इन्स्टामार्टवरून रेड बुल ऑर्डर केल्याचं व्हिडीओमध्ये सांगितलं. मात्र, डिलिव्हरी मिळाल्यानंतर तिच्या घरात एक झुरळ फिरताना दिसलं. श्वेताने या झुरळाचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडीओमध्ये झुरळ घरात इकडून तिकडे फिरताना दिसत आहे. श्वेताने कॅमेऱ्याने त्यावर झूम करत संपूर्ण प्रकार चाहत्यांना दाखवला.

‘मुंडेजी, तुम्ही कुठे आहात?’

श्वेता तिवारीने हा प्रकार गंभीरपणे सांगण्याऐवजी विनोदी अंदाजात मांडला. ती म्हणताना दिसते, “मी इन्स्टामार्टवरून रेड बुल ऑर्डर केले होते आणि त्या रेड बुलसोबतच इन्स्टामार्टमधून एक झुरळही आमच्या घरात आले.”

यानंतर झुरळ संपूर्ण घरात पळत असल्याचं दाखवत तिने म्हटलं, “आपण तुकाराम मुंडे यांना टॅग करायचे का? मुंडेजी, इन्स्टामार्टमधून आमच्या घरात झुरळे येत आहेत. तुम्ही कुठे आहात? कृपया लक्ष द्या.” श्वेताने संबंधित डिलिव्हरी ॲपलाही टॅग केलं आहे.

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

तुकाराम मुंडेंनाच का केलं टॅग?

तुकाराम मुंडे हे त्यांच्या कडक प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जातात. अन्न आणि औषध प्रशासनाशी संबंधित कारवाईमुळे ते अलीकडे चर्चेत आहेत. त्यामुळेच श्वेताने आपल्या व्हिडीओमध्ये त्यांना मजेशीर पद्धतीने टॅग केल्याचं दिसतं.

श्वेताचा हा व्हिडीओ विनोदी असला तरी, ऑनलाइन फूड डिलिव्हरीदरम्यान स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा मुद्दाही यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

‘द ट्रेटर्स २’मध्ये श्वेता तिवारी

दरम्यान, कामाच्या आघाडीवर श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स २’मध्ये दिसत आहे. करण जोहर होस्ट करत असलेला हा शो प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. या सीझनमध्ये क्रिस्टल डिसूझा, मल्लिका शेरावत, मुनव्वर फारुकी, रिया चक्रवर्ती, रणवीर ब्रार यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.

शोमध्ये श्वेता तिवारीच्या स्पष्टवक्तेपणाचीही चर्चा होत आहे. स्पर्धकांमधील नातेसंबंध आणि तिच्या वक्तव्यांमुळे ती सातत्याने चर्चेत राहिली आहे. आता रेड बुलच्या डिलिव्हरीसोबत आलेल्या झुरळाच्या या मजेशीर किस्स्यामुळे तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Amrapali Dubey-Nirahua: आम्रपाली दुबे -निरहुआच्या नात्याची पुन्हा चर्चा; विवाहित अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहतेय अभिनेत्री?

Web Title: Shweta tiwari sought help tukaram munde live cockroach cold drink video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Cockroaches
  • Shweta Tiwari
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका
1

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका

सणासुदीत FDA ची धडक कारवाई! पुणे विभागात तब्बल १७ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित
2

सणासुदीत FDA ची धडक कारवाई! पुणे विभागात तब्बल १७ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
3

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.