( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Amrapali Dubey-Nirahua: भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी दिनेशलाल यादव ‘निरहुआ’ आणि आम्रपाली दुबे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘जिओ हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या ‘भोजपुरी बावल’ या रिअॅलिटी शोमध्ये नुकताच आम्रपाली दुबे यांचा एक एपिसोड चर्चेत आला. या कार्यक्रमात अभिनेत्रीला तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही काही थेट प्रश्न विचारण्यात आले.
निरहुआसोबतच्या नात्यावर अँकरचा थेट सवाल
कार्यक्रमाचे अँकर शुभंकर मिश्रा यांनी आम्रपाली यांना निरहुआबद्दल थेट प्रश्न विचारला. निरहुआ तिचा भाऊ आहे का, असा सवाल करण्यात आला. यावर आम्रपाली यांनी स्पष्टपणे सांगितलं की, निरहुआ तिचे को-ॲक्टर आणि चांगले मित्र आहेत.
मात्र, त्यानंतर अँकरने त्यांच्या नात्याबाबत आणखी वैयक्तिक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याचं उघडपणे का मान्य करत नाहीत, असा सवालही करण्यात आला.
अँकरने पुढे निरहुआ त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत असल्याचा दावा केला. ते घरी जात नाहीत आणि आम्रपाली त्यांच्या मुलांची काळजी घेतात, असा दावाही कार्यक्रमात करण्यात आला. या प्रश्नांमुळे आम्रपाली अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं.
अभिनेत्रीने अँकरला मध्येच थांबवत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अशा प्रकारे प्रश्न विचारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तिने कठोर शब्दांत आपली भूमिका मांडली. आम्रपालीच्या या प्रतिक्रियेमुळे कार्यक्रमातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं.
दिनेशलाल यादव ‘निरहुआ’ आणि आम्रपाली दुबे यांनी अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबतच्या अफवा अनेकदा चर्चेत येतात.
मात्र, दोन्ही कलाकारांनी सार्वजनिकपणे एकमेकांना मित्र आणि सहकलाकार म्हणूनच संबोधल्याचं पाहायला मिळतं. ‘भोजपुरी बावल’मध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.
View this post on Instagram
याच कार्यक्रमात आम्रपाली दुबे यांनी पवन सिंह यांच्याबाबतही एक मजेशीर वक्तव्य केलं. त्यांनी गंमतीने पवन सिंह यांना लग्नाची मागणी घातली आणि दोघे मिळून मुलं वाढवतील, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळेही कार्यक्रमात मनोरंजनाचा रंग पाहायला मिळाला.
आम्रपाली दुबे यांच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी अँकरने विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी आम्रपाली यांनी स्पष्टपणे भूमिका मांडल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे.
‘भोजपुरी बावल’ हा रिअॅलिटी शो २ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाला असून, शोमध्ये भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील कलाकार सहभागी होत आहेत. कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित थेट प्रश्न विचारले जात असल्याने कार्यक्रमातील अनेक प्रसंग चर्चेत येत आहेत.
दरम्यान, निरहुआ आणि आम्रपाली दुबे यांच्या नात्याबाबत कार्यक्रमात करण्यात आलेले दावे अँकरने केलेले दावे आहेत; त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या चर्चांकडे अफवा किंवा शोमधील आरोप म्हणूनच पाहणं योग्य ठरेल.
Tumbbad 2: ‘तुम्बाड’च्या आठवणी पुन्हा ताज्या! रेकीदरम्यान सापडले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे






