Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाईजानच्या भाऊच्या यातना! ‘लहानपणी झालं यौन शोषण’ अखेर Sohail Khan बोललाच; सगळं केलं स्पष्ट

अभिनेता सोहेल खानने आपल्या बालपणीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी अनुभवाचा पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या खुलासा केला आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये बोलताना त्याने लहानपणी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागल्याचे सांगत अनेक वर्षे ही बाब भीती आणि लाजेमुळे कुणालाही सांगू शकलो नव्हतो, असे म्हटले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 16, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेता सोहेल खानने आपल्या बालपणीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी अनुभवाचा पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या खुलासा केला आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये बोलताना त्याने लहानपणी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले. अनेक वर्षे ही घटना मनात दडवून ठेवल्यानंतर प्रौढ झाल्यावरच आपण वडिलांना याबाबत सांगितल्याचे त्याने उघड केले. त्या काळात भीती आणि लाजेमुळे हा अनुभव कुणासोबतही शेअर करण्याचे धाडस झाले नव्हते. या अनुभवातून मुलांनी कोणतीही अडचण किंवा वेदना पालकांपासून लपवू नये, असा महत्त्वाचा संदेशही त्याने दिला.

निलेश साबळे घेऊन येतोय नवीन शो! अभिनेत्याने दिली चाहूल, म्हणाला ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!

सोहेल खान नुकताच ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. शोदरम्यान एका स्पर्धकाशी संवाद साधताना त्याने आपल्या आयुष्यातील हा धक्कादायक प्रसंग सांगितला. लहानपणी एका व्यक्तीने त्याचे लैंगिक शोषण केले होते, मात्र अनेक वर्षे त्याने ही गोष्ट मनातच दडवून ठेवली होती, असे त्याने स्पष्ट केले.

सोहेल म्हणाला, “मोठा झाल्यानंतर मी वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी मला विचारलं, ‘इतकी वर्षे तू हे मनात का ठेवलेस?’ त्यावर मी सांगितलं की, या विषयावर बोलताना मला खूप लाज वाटत होती.” अशा घटनांमध्ये पीडित व्यक्तीची कोणतीही चूक नसतानाही ती स्वतःलाच दोष देऊ लागते किंवा लाजते, असेही त्याने सांगितले.

Aamir Khan : अभिजीत दिपकेने अभिनेत्यावर साधला निशाणा! म्हणाला ‘ज्या माणसाच्या नावावर इतके पैसे…’

यावेळी त्याने रॅगिंग आणि बुलिंगविरोधातही ठाम भूमिका घेतली. “मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो की, कुणी त्रास देत असेल किंवा बुलिंग करत असेल तर कोणताही संकोच न बाळगता माझ्याकडे या. मी स्वतः अशा अनुभवातून गेलो आहे,” असे तो म्हणाला. याशिवाय, याच कार्यक्रमात त्याने पत्नी सीमा खानसोबतच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि दोघांच्या विभक्त होण्यामागील कारणांवरही भाष्य केले.

Web Title: Sohail khan shared about he has been sexually assaulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.