फोटो सौजन्य - Social Media
The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे
निलेश साबळेने शेअर केली पोस्ट
अभिनेता डॉ. निलेश साबळेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!’ हे नमूद असलेला पोस्टर दिसून येत आहे. तसेच पोस्टच्या खाली कॅप्शनमध्ये “आता या पोस्ट ला ‘शक्तिमानचं’ म्यूजिक का? … म्हणूनच तर हा शो मॅड आहे…!!! लवकरच…!!!” असं नमूद केले आहे, त्यामुळे Zee Marathi वाहिनेच्या प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांचे उत्तरं लवकरच मिळणार आहे.
Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी
चाहत्यांची प्रतिक्रिया काय?
निलेश साबळेने दिलेली चाहूल पाहून अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका चाहत्याने तर “हसतायना मंडळी हसायलाच पाहिजे….” अशी कमेंट करत ‘चला हवा येऊ द्या‘ या शोची आठवण करून दिली आहे. विविध कलाकारांनी सोशल मीडियावर निलेश साबळेचे त्याच्या नव्या शोसाठी अभिनंदन केले आहे. एकाने ‘दादा… ओढ लागे जीवा‘ अशी अफलातून कमेंट केली आहे तर निलेशच्या एका चाहत्याने “दादा तुमच्या शिवाय मज्जाच नाही zee मराठी मध्ये …लवकर चला हवा येऊ द्या सारखं काहीतरी भन्नाट घेऊन या” अशी कमेंट करत त्याच्या भावना सांगितल्या आहेत.






