Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सिरीजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मराठी रंगभूमीच्या सादरीकरणात मोठे बदल होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2026 | 10:55 AM
वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग

वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सिरीजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मराठी रंगभूमीच्या सादरीकरणात मोठे बदल होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. बदलत्या प्रेक्षकवर्गाच्या आवडीनिवडी लक्षात घेत मराठी नाटकांमध्ये कथानकाची गती, तांत्रिक मांडणी, संवादशैली आणि विषयांची निवड यामध्ये नवे प्रयोग केले जात आहेत. विशेषतः तरुण प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक वेब सिरीजच्या शैलीचा प्रभाव स्वीकारताना दिसत आहेत.

 

मराठी नाटकांमध्ये दीर्घ संवाद, भावनिक प्रसंग आणि पारंपरिक रंगमंचीय मांडणीला अधिक महत्त्व दिले जात होते. मात्र आता प्रेक्षकांची एकाग्रता कमी वेळ टिकत असल्याने कथानक अधिक वेगवान, थेट आणि वास्तववादी करण्यावर भर दिला जात आहे. वेब सिरीजप्रमाणेच नाटकांमध्ये सस्पेन्स, थरार, डार्क कॉमेडी, रिलेशनशिप ड्रामा आणि सामाजिक वास्तवावर आधारित विषय अधिक प्रमाणात हाताळले जात आहेत. तंत्रज्ञानाचाही रंगभूमीवर मोठा प्रभाव पडत आहे. एलईडी स्क्रीन, डिजिटल साउंड डिझाइन, सिनेमॅटिक लाईटिंग आणि मल्टिमीडिया इफेक्ट्सचा वापर वाढला आहे. काही नाटकांमध्ये दृश्य बदल जलद करण्यासाठी डिजिटल सेट डिझाइनचा वापर केला जातो. त्यामुळे नाटकांचा अनुभव अधिक आकर्षक आणि आधुनिक होत असल्याचे जाणकार सांगतात.

ओटीटी आणि वेब सिरीजच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी रंगभूमीत मोठे बदल घडताना दिसत आहेत. डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या कथानकात, संवादशैलीत आणि सादरीकरणात आधुनिक प्रयोग केले जात आहेत. आजची तरुण पिढी वेगवान आणि वास्तववादी कथांना अधिक पसंती देत असल्याने नाटकांमध्ये सस्पेन्स, रिलेशनशिप ड्रामा आणि सामाजिक विषयांचा समावेश वाढला आहे. – शंतनू गायकवाड, नाटककार.

चित्र बदलतेय, आत्मा जपणे आवश्यक

या बदलांमुळे पारंपरिक रंगभूमीची ओळख कमी होण्याची भीती काही ज्येष्ठ रंगकर्मी व्यक्त करतात. नाटक हे केवळ मनोरंजन नसून प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारे माध्यम आहे. त्यामुळे डिजिटल प्रभाव स्वीकारताना रंगभूमीचा आत्मा जपणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, वेब सिरीजच्या प्रभावामुळे मराठी नाटकांना नवे प्रेक्षक मिळत असल्याचे सकारात्मक चित्रही समोर येत आहे. तरुण पिढी थिएटरकडे पुन्हा वळू लागल्याने रंगभूमीला नवसंजीवनी मिळत असल्याचे निर्माते सांगतात. बदलत्या काळानुसार स्वतःला नव्याने घडवत मराठी रंगभूमी आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे या प्रवाहातून दिसून येत आहे.

मी स्वतः ओटीटी आणि रंगभूमी दोन्हीकडे अभिनय करतो. पारंपारिक पद्धतीच्या नाटकांमध्ये लाऊड अभिनय गरजेचा असायचा परंतु सध्या नैसर्गिक अभिनय बघायला प्रेक्षकांना जास्त रस आहे त्यामुळे आम्ही नाटकांमध्ये सुद्धा तसे प्रयोग करून बघितले आणि ते प्रेक्षकांनी उचलून धरले. हल्लीचा प्रेक्षक वर्ग सुद्धा नाटकाबद्दल वेगळी आवड जपून असलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीनुसार आपल्या अभिनयामध्ये बदल करणे कलाकारासाठी गरजेचे झाले आहे. – जीवन आघाव, ओटीटी आणि नाट्य कलाकार.

हे सुद्धा वाचा : ‘सिस्टम’ चित्रपटाच्या कास्टिंगची फिल्मी गोष्ट, आदिनाथ कोठारेने केला किस्सा शेअर

Web Title: The growing popularity of ott platforms and web series is leading to major changes in the presentation of marathi theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Marathi web series
  • OTT
  • Web Series

संबंधित बातम्या

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
1

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.