Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील कथित हल्ल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी भेट घेतली असून मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 19, 2026 | 08:21 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर अभिनेत्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाला वेग दिला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी १२ पथके तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

टायगर श्रॉफच्या हल्ल्यानंतरचे फोटो व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास टायगर श्रॉफ फुटबॉल सामना खेळून जुहू परिसरातून परतत असताना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हल्ल्यानंतरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये टायगर स्वतः गाडीचे स्टेअरिंग सांभाळताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

Resham Tipnis Viral Video: वयाच्या 53 व्या वर्षी अभिनेत्री पुन्हा बोहल्यावर चढणार? लग्नपत्रिका वाटतानाचा VIDEO व्हायरल

एकनाथ शिंदेंनी घेतली टायगर श्रॉफची भेट

या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल फोटोंमध्ये टायगरच्या हातावर प्लास्टर आणि शरीरावर ओरखडे दिसत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या हाताला गनपावडरमुळे भाजल्याची शक्यताही काही वृत्तांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या दुखापतींचे नेमके कारण आणि स्वरूप अधिकृतरीत्या स्पष्ट होणे आवश्यक आहे.

जखमी ड्रायव्हरला टायगरने स्वतः नेले रुग्णालयात?

या घटनेत टायगरचा कारचालक फिरदौस आणि आणखी दोघे जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगरने स्वतः गाडी चालवत जखमींना नानावटी रुग्णालयात नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी टायगरच्या ड्रायव्हरचा जबाब नोंदवला आहे. त्याने तीन अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर गोळीबार केल्याचे सांगितल्याची माहिती आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?

लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तीने घेतली जबाबदारी?

या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या अनिल पंडितने स्वीकारल्याचे वृत्त आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती असून, इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. तपासातून या हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Tiger shroff firing case viral photos eknath shinde meeting ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • entertainment
  • firing
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Tiger Shroff : मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार, तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन केली फायरिंग!
1

Tiger Shroff : मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार, तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन केली फायरिंग!

Sachin Pilgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो भावूक निरोप! सचिन पिळगांवकरांनी सांगितला ‘नवरा माझा नवसाचा’शी संबंधित किस्सा
2

Sachin Pilgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो भावूक निरोप! सचिन पिळगांवकरांनी सांगितला ‘नवरा माझा नवसाचा’शी संबंधित किस्सा

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर
3

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एलिमिनेशन! सलमान खान कोणाला दाखवणार घराबाहेरचा रस्ता?
4

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एलिमिनेशन! सलमान खान कोणाला दाखवणार घराबाहेरचा रस्ता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.