Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunny Deol Birthday: शाहरुखसमोर फाडली जीन्स, दिग्दर्शकाशीही झाला वाद; सनी देओलचे भन्नाट किस्से चर्चेत!

Sunny Deol Birthday: सनी देओलचं खरं नाव अजय सिंग देओल आहे. ‘डर’ चित्रपटाच्या सेटवरील शाहरुख खानसोबतचा किस्सा आणि अभिनेत्याच्या कारकिर्दीतील रंजक गोष्टी जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 19, 2026 | 10:01 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sunny Deol Birthday: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र, आपल्या मेहनतीच्या आणि दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता सनी देओलचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या दमदार संवादफेकीने आणि ॲक्शन भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सनी देओल आज चर्चेत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि कारकिर्दीतील काही रंजक किस्से.

सनी देओलचं खरं नाव काय?

सनी देओलचा जन्म पंजाबमधील सहनेवाल येथे झाला. फार कमी लोकांना माहीत आहे की, सनी देओलचं खरं नाव अजय सिंग देओल आहे. घरी त्याला सनी या नावाने हाक मारली जायची. पुढे चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना त्याने हेच नाव स्वीकारलं आणि याच नावाने तो घराघरांत लोकप्रिय झाला.

‘बेताब’मधून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

सनी देओलने १९८३ मध्ये राहुल रावैल दिग्दर्शित ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाची निर्मिती त्याचे वडील धर्मेंद्र यांनी केली होती. रोमँटिक कथानक असलेल्या या चित्रपटात तरुण प्रेम, कौटुंबिक बंधनं आणि भावनिक संघर्ष पाहायला मिळाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि सनी देओलला अभिनेता म्हणून ओळख मिळाली.

विशेष म्हणजे, रोमँटिक चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सनीने पुढे ॲक्शन हिरो म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘अर्जुन’, ‘डकैत’, ‘पाप की दुनिया’, ‘यतीम’, ‘वर्दी’, ‘त्रिदेव’ आणि ‘चालबाज’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

‘डर’च्या सेटवर शाहरुख खानमुळे संतापला होता सनी देओल

सनी देओलच्या आयुष्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या किस्स्यांपैकी एक म्हणजे १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर’ चित्रपटाचा. या चित्रपटात सनी देओल आणि शाहरुख खान यांनी एकत्र काम केलं होतं. मात्र, चित्रपटातील शाहरुखच्या भूमिकेला अधिक महत्त्व दिलं जात असल्याने सनी नाराज झाल्याचं सांगितलं जातं.

या नाराजीचा परिणाम चित्रीकरणादरम्यानही दिसून आला. एका चर्चित किस्स्यानुसार, रागाच्या भरात सनीने स्वतःची जीन्स फाडली होती. या चित्रपटानंतर दोघांमध्ये काही काळ दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र, कालांतराने त्यांच्या नात्यात सुधारणा झाल्याचं बोललं जातं.

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर CCTV मध्ये कैद, दोन संशयितांचे फोटो समोर

राजकुमार संतोषींसोबतही झाले होते मतभेद

सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारखे गाजलेले चित्रपट दिले. या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मात्र, पुढे भगतसिंग यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यावरून आणि सनीचा भाऊ बॉबी देओल याला चित्रपटात संधी देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद झाल्याचं सांगितलं जातं.

या पार्श्वभूमीवर राजकुमार संतोषी यांनी अजय देवगणला घेऊन ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ हा चित्रपट बनवला, तर सनी देओलने बॉबी देओलसोबत ‘२३ मार्च १९३१: शहीद’ या चित्रपटात काम केलं. विशेष म्हणजे, हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते.

पुढे सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र काम केलं. त्यांच्या या व्यावसायिक नात्यातील चढ-उतारांची आजही चित्रपटप्रेमींमध्ये चर्चा होते.

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल

मेहनतीच्या जोरावर निर्माण केली वेगळी ओळख

धर्मेंद्र यांचा मुलगा म्हणून सनी देओलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असलं, तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. रोमँटिक भूमिका असोत किंवा दमदार ॲक्शन सीन्स, सनीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याच्या कारकिर्दीतील अनेक किस्से आजही चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरतात.

Web Title: Sunny deol birthday real name shah rukh khan interesting facts ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Birthday
  • entertainment
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर CCTV मध्ये कैद, दोन संशयितांचे फोटो समोर
1

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर CCTV मध्ये कैद, दोन संशयितांचे फोटो समोर

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल
2

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल

Sachin Pilgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो भावूक निरोप! सचिन पिळगांवकरांनी सांगितला ‘नवरा माझा नवसाचा’शी संबंधित किस्सा
3

Sachin Pilgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो भावूक निरोप! सचिन पिळगांवकरांनी सांगितला ‘नवरा माझा नवसाचा’शी संबंधित किस्सा

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर
4

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.