Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम

'Toxic' Box Office Collections Day 4: यशच्या ‘टॉक्सिक’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चित्रपटाने ४ दिवसांत १९०.४५ कोटींची कमाई करत चौथ्या दिवशी ‘धुरंधर’लाही मागे टाकलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 08:50 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टॉक्सिकचा चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम
  • चार दिवसांत १९० कोटींचा टप्पा पार
  • संमिश्र प्रतिक्रिया, तरीही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
‘Toxic’ Box Office Collections Day 4: यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या, तरी बॉक्स ऑफिसवरील त्याची घोडदौड सुरूच आहे. ‘टॉक्सिक’ने चार दिवसांत भारतात तब्बल १९०.४५ कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे चौथ्या दिवसाच्या कमाईत या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’लाही मागे टाकलं आहे.

चौथ्या दिवशी किती कमावले?

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘टॉक्सिक’ने चौथ्या दिवशी २४.५० कोटी रुपयांची कमाई केली. या दिवशी चित्रपटाचे १७,६१२ शो झाले असून, एकूण २४.३ टक्के ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली.

यामध्ये चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने सर्वाधिक योगदान दिलं. हिंदी व्हर्जनने चौथ्या दिवशी १५.५ कोटी रुपये कमावले. या आवृत्तीची ऑक्युपन्सी २३ टक्के होती आणि १२,८२२ शो झाले.

कन्नड आवृत्तीने ६.६० कोटी रुपये, तर तेलुगू आवृत्तीने सुमारे १.५० कोटी रुपये कमावले. मल्याळम आणि तमिळ आवृत्तीतूनही चित्रपटाच्या कमाईत भर पडली.

चार दिवसांत १९० कोटींचा टप्पा पार

‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली. चित्रपटाने १०१.१० कोटी रुपयांची ओपनिंग घेतली. दुसऱ्या दिवशी कमाईत घट होऊन ३७.६५ कोटी रुपये, तर तिसऱ्या दिवशी २७.२० कोटी रुपये जमा झाले.

चौथ्या दिवशी २४.५० कोटींची कमाई करत चित्रपटाची भारतातील चार दिवसांची एकूण कमाई १९०.४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

‘टॉक्सिक’ची कमाई :

पहिला दिवस – ₹१०१.१० कोटी
दुसरा दिवस – ₹३७.६५ कोटी
तिसरा दिवस – ₹२७.२० कोटी
चौथा दिवस – ₹२४.५० कोटी
एकूण – ₹१९०.४५ कोटी
‘धुरंधर’ला टाकलं मागे

चौथ्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘टॉक्सिक’ने ‘धुरंधर’ला मागे टाकलं आहे. ‘धुरंधर’ने चौथ्या दिवशी २३.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याच्या तुलनेत ‘टॉक्सिक’ने चौथ्या दिवशी २४.५० कोटी रुपये कमावत आघाडी घेतली.

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

यशसोबत दिसणार तगडी स्टारकास्ट

‘टॉक्सिक’चं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं आहे. चित्रपटात यश मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत कियारा अडवाणी, नयनतारा, रुक्मिणी वसंत, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.

चित्रपटात यशची दुहेरी भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. यश आणि कियारा अडवाणी यांच्या केमिस्ट्रीचीही चर्चा झाली आहे. चित्रपटातील काही बोल्ड सीन्समुळेही तो चर्चेत आला.

संमिश्र प्रतिक्रिया, तरीही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई

‘टॉक्सिक’च्या ट्रेलरपासूनच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, प्रदर्शनानंतर चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही प्रेक्षकांनी कथानक आणि त्यातील ट्विस्टचं कौतुक केलं, तर काहींनी कथा गोंधळात टाकणारी आणि काही ठिकाणी कंटाळवाणी असल्याचं म्हटलं.

तरीही यशच्या स्टारडमचा फायदा चित्रपटाला मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर आता चार दिवसांत १९० कोटींची कमाई करत ‘टॉक्सिक’ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Web Title: Toxic box office collections day 4 yash movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode
1

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?
2

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क
3

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!
4

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.