
फोटो सौजन्य सोशल मिडिया
आगामी गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ (Khokha Run) नावाचा एक नवा उपरोधिक डिजिटल गेम ऑनलाइन लॉन्च करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या व्यंगचित्रावर आधारित आहे. या मध्ये विनोद, उपरोध आणि इंटरॲक्टिव्ह गेमप्लेच्या माध्यमातून गोवा काँग्रेस संबंधित राजकीय चर्चेवर भाष्य करण्याचा प्रयत्न या गेममधून अॅप मधून करण्यात आला आहे.
हा गेम गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या व्यंगचित्रावर आधारित आहे. असे व्यंगात्मक रुप या गेममध्ये दाखवले आहे की, या मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे सामान्य माणसांना बाजुवा करुन, पैसे वाल्यांना कशी उमेदवारी देतात अशा प्रकारचे व्यंगात्मक रुप दाखवण्यात आले आहे. यात गेम मध्ये कमीत कमी वेळात जास्त तिकिटे गोळा करायची असतात. यात लाईव्ह लीडरबोर्ड सुद्धा आहे. या मेत मध्ये साप्ताहिक बक्षिसे सुद्दा जाहिर करण्यात आली आहे. या गेमला एका उपरोधिक प्लॅटफॉर्मशी जोडले गेले असून त्याचे नाव Khoka Ticket ok 4 असे ठेवण्यात आले आहे.
खोका गेम गोवा काँग्रेसचेअध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या व्यंगचित्रात्मक प्रतिमेवर आधारित आहे. संभाव्य आमदारपदाच्या उमेदवारांना पक्षाची तिकिटे विकल्याच्या आरोपांभोवती राज्यातील राजकीय चर्चेत सुरू असलेल्या दाव्यांपासून त्याला प्रेरणा मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपांना विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने गेमिंगच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या व्यंगचित्रावर आधारित आहे. गोव्यातील काँग्रेसशी संबंधित पैशांचे व्यवहार, राजकीय तिकीट वाटप आणि जमीनविषयक वादांभोवतीच्या आरोपांचा विनोदी पद्धतीने संदर्भ देण्यात आला आहे. या मुळे निर्मात्यांच्या मते, पारंपरिक राजकीय संदेशांऐवजी गेमिंग, विनोद आणि उपरोधाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.