Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KEM Hospital: २५ आठवड्यांचं ६०० ग्रॅमचं बाळ… मृत्यूवर मात करून ‘इवला योद्धा’ जिंकला!

अवघ्या २५ आठवड्यांत आणि ६०० ग्रॅम वजनाने जन्मलेल्या बाळाने मृत्यूशी झुंज देत अखेर जीवनाची लढाई जिंकली. हे बाळ स्थिर होऊन केईएम रुग्णालयातून सुखरूप घरी परतले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 07, 2026 | 06:48 PM
२५ आठवड्यांचं ६०० ग्रॅमचं बाळ… मृत्यूवर मात करून ‘इवला योद्धा’ जिंकला

२५ आठवड्यांचं ६०० ग्रॅमचं बाळ… मृत्यूवर मात करून ‘इवला योद्धा’ जिंकला

Follow Us
Follow Us:
  • महिन्यांच्या उपचारानंतर सुखरूप घरी डिस्चार्ज
  • २५ आठवड्यांचं ६०० ग्रॅमचं बाळ
  • ‘इवलाशा योद्धा’ने केली मृत्यूवर मात
मुंबई : अवघ्या २५ आठवड्यांत आणि केवळ ६०० ग्रॅम वजनाने जन्मलेले बाळ… सुरुवातीपासूनच मृत्यूशी झुंज देत होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर या ‘इवल्या योद्ध्या’ने अखेर जीवनाची लढाई जिंकली. महिन्यांच्या उपचारानंतर केईएम रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागातून हे बाळ आता पूर्णपणे स्थिर होऊन सुखरूप घरी परतले आहे.

जन्मानंतर लगेचच बाळाला तीव्र श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने व्हेंटिलेशनवर ठेवावे लागले. त्याचबरोबर सेप्सिस आणि पॅटन्ट डक्टस आर्टेरिओसस यांसारख्या गंभीर गुंतागुंतींनाही सामोरे जावे लागले. अत्यंत नाजूक स्थितीत असलेल्या या बाळावर दीर्घकाळ उपचार सुरू ठेवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, बारकाईने निरीक्षण आणि नर्सिंग स्टाफच्या समर्पित सेवेमुळे बाळाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर बाळ पूर्णपणे स्थिर झाले आणि त्याला घरी सोडण्यात आले. या यशस्वी उपचारामागे डॉ. अनिता हरिबालकृष्णा यांच्या नेतृत्वाखालील टीमचे मोठे योगदान असल्याचे केईएम रुग्णालय अधिष्ठात्री डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या लहान जीवाने दाखवलेली जिद्द आणि वैद्यकीय टीमच्या मेहनतीमुळे मिळालेले हे यश वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका

‘प्रसूतीपूर्व कळा लवकर आल्याने बाळाचा अकाली जन्म झाला. अशा वेळी मेंदूतील रक्तप्रवाह अत्यल्प असतो आणि परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक असते. मात्र हे बाळ कोणतीही मोठी गुंतागुंत न ठेवता सुखरूप घरी गेले, ही अत्यंत दुर्मिळ आणि समाधानकारक बाब आहे.’ अशी प्रतिक्रिया केईएम रुग्णालय शिशु विभाग प्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्णा यांनी दिली.

दरम्यान, मुंबईच्या केईएम रुग्णालयाने आपला १०० वा वर्धापनदिन साजरा केला आहे. याप्रसंगी, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णालयाच्या गौरवशाली इतिहासाविषयी आणि भविष्यातील ‘आयुष्मान शताब्दी टॉवर’ प्रकल्पाविषयी माहिती दिली. रोबोटिक शस्त्रक्रिया, स्पोर्ट्स मेडिसिन आणि नवीन आयसीयू केंद्र सुरू करून केईएम रुग्णालय आता रुग्णांना अधिक चांगली सेवा कशी देत ​​आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.

दररोजच्या छोट्या बदलांनी टाळा मोठे आजार: मधुमेह, लठ्ठपणा आणि बीपीवर प्रभावी उपाय

Web Title: 25 week 600 gram premature baby survives against odds tiny warrior beats death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • Hospital
  • KEM HOSPITAL
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.