फोटो सौजन्य सोशल मिडिया
अल्झायमर झालेल्या व्यक्तीला वारंवार नावे विसरणे दिलेली माहिती विसरणे, पुन्हा- पुन्हा एकच प्रश्न विचारणे, महत्त्वाच्या तारखा आणि घटनांचा विसर पडणे ही अल्झायमरची कारणे आहेत. अल्झायमर झालेल्या व्यक्तिला एकाग्रतेची अडचण येऊ शकते. वेळेत आणि ठिकांनाची नावे लक्षात न राहणे, दृष्य आणि अवकाशीय प्रतिमांना समजावून घेण्यास अडचण होणे, उदा – वाचण्यात अडचण निर्माण होणे, रंगाचा फरक ओळखणे, बोलण्यात आणि लिहण्यात अडथळा निर्माण होणे.
अल्झायमर झालेल्या व्यक्तीला गोंधळलेले आणि थकलेले वाटत असते, या मध्ये आपले छंद, सामाजिक उपक्रम किंवा त्यांना आवडत असलेले काम ते टाळत असतात. त्यांना मित्रांशी आणि सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्यास कोणतीच रुची नसते. अल्झायमर झालेली व्यक्ती नेहमी गोंधळलेली, संशयास्पद, नैराश्यग्रस्त, भयभीत किंवा चिंताग्रस्त असते.
ही लक्षणे लवकर ओळखल्याने तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला नियोजन करण्याची, उपचार सुरू करण्याची आणि समर्थन सेवांमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. अद्याप कोणताही इलाज नसला तरी, लक्षणे व्यवस्थापित करण्याचे, मेंदूचे आरोग्य सुधारण्याचे आणि रोगाची प्रगती विलंब करण्याचे मार्ग आहेत.
अल्झायमर झालेल्या व्यक्तींना किमान दोन ते तीन असे घटक असतात. ज्या मध्ये अल्झायमर झालेली व्यक्ती ही रक्तदाब आणि मधुमेह सारख्या आजाराने ग्रस्त असतात… यात शारिरिक गोष्टींचा अभाव व्यसनाधीनता या सर्व गोष्टी कारणीभूत ठरु शकतात. अल्झायमरचा कोणताही इलाज नसला तरी त्याची लक्षणे सुधारणे, मेंदूचे आरोग्य सुधारण्याचे आणि रोगाची प्रगती विलंब करण्याचे मार्ग आहेत.






