Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फटाक्यांच्या धुराने डोळ्यांमध्ये जळण होतेय? अशाप्रकारे मिळवा आराम

दिवाळीच्या सणात देशामध्ये सगळीकडे फटाके फोडले जातात. दरम्यान फटाक्यांचे रसायन धुराच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांमध्ये जाते आणि आपल्या डोळ्यांमध्ये जखम होते. अशाप्रकारे मिळवता येईल आराम.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 02, 2024 | 08:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी हा उजाळ्याचा उत्सव आहे. देशभरात दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. लहान मुले असो किंवा प्रौढ व्यक्ती प्रत्येकाला फटाके उडवण्याची हौस असते. दिवाळीमध्ये या हौसेला चालना देण्याची संधी मिळते. या उत्सवात लोक फटाके फोडून आपला आनंद आणि जल्लोष साजरा करतात.
वनवासानंतर प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत आगमन म्हणून देशात दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली. या दिवसात घरोघरी पणत्या लागू लागल्या. आगमनामुळे उत्सव म्हणून लोक फटाके फोडू लागले आपला आनंद व्यक्त करू लागले.

हे देखील वाचा : महिलांसाठी खजूर आहे फायदेशीर, रोज रिकाम्या पोटी खावे 2 खजूर

परंतु आत्ताच्या घडीला वाढत्या प्रदूषणामध्ये फटाक्यांचा जास्त वापर प्रदूषणाला आणखीन दूषित करत आहे. त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत आहे. फटाक्यांमुळे तयार होणाऱ्या धुराचा आपल्या डोळ्यांना त्रास होण्याची दाट शक्यता असते. हा धूर आपल्या डोळ्यांमध्ये जाऊन आपल्या डोळ्यांचे आरोग्याला तडा देतो आणि आपले डोळ्यांचे आरोग्य विस्कळीत होते. जर तुमच्या डोळ्यांना या गोष्टीचा त्रास होत असेल तर काही टिप्स आहेत ज्यांचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याचा बचाव करू शकता.

अशा परिस्थितीत जर डोळ्यांमध्ये जलन होत असेल. तर सर्वप्रथम आपल्या हात धुवावे. बिन धुतलेल्या हाताने कधीच डोळ्यांना स्पर्श करू नये. फटाक्यांमधून निघणारे रसायन आपल्या डोळ्यांमध्ये अजून पसरले जातील आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतील. त्यामुळे अशा परिस्थितीत हात धुवावे मगच त्यांचा स्पर्श डोळ्यांना करावा. परंतु डोळे न चोळता किंवा तेथे बर्फ न शेकवता आपण डोळ्यांच्या आरोग्य वाचवू शकतो. थंड पाण्याने डोळ्यांना धुणे कधीही योग्य आणि उत्तम ठरेल.

हे देखील वाचा : शापित गाव! एका रात्रीत निर्मनुष्य झालं राजस्थानचे ‘हे’ गाव; आजही या ठिकाणी जायला घाबरतात लोक

जरा डोळ्यांना या परिस्थितीत जखम झाली असेल तर प्रभावित डोळ्यांना खाजवू नये किंवा चोळू नये. अशा परिस्थितीत डोळ्यांना चोळल्याने जखम आणखीन वाढू शकते तसेच इतर संक्रमणही होऊ शकतात. डोळ्यांना हाताने पकडण्या ऐवजी कॉटनच्या स्वच्छ कपड्याने झाकून ठेवावे ज्याने होणारी जळण कमी होईल. तसेच डोळ्यांना आराम मिळेल. डोळ्यांना जखम लहान असो किंवा मोठी अशा परिस्थितीत डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही योग्य ठरते. काहीही गोष्ट करण्या पहिला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Web Title: Burning in the eyes due to the smoke of crackers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 08:50 PM

Topics:  

  • Diwali 2024
  • Health Tips

संबंधित बातम्या

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण
1

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…
2

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…
3

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
4

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.