खजूर हा एक अत्यंत पोषणयुक्त आणि स्वादिष्ट ड्राय फ्रुट आहे, जो मुख्यतः मध्य पूर्व आणि उत्तर अफ्रिका येथे वाढतो. खजूरांचे विविध प्रकार आहेत. खजूरात कमी कॅलोरीज असून, त्यात उच्च प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स, आणि खनिजे असतात. हे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतात. खजूर हे सर्वांसाठीच फायदेशीर आहे पण महिलांसाठी ते जास्त फायदेशीर ठरते. चला खजूर खाल्ल्याने महिलांना होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
खजूर खाल्ल्याने महिलांना होतो विशेष फायदा(फोटो सौजन्य: iStock)
फेर्टीलिटीसाठी फायदेशीर: खजूर प्रजनन व्यवस्थेला प्रजननक्षमतेपासून ओव्हुलेशन, हार्मोनल संतुलन आणि प्रसूतीपर्यंत आधार देऊ शकतात. खजुराचे सेवन प्रजनन क्षमता आणि हार्मोनल समस्यांमध्ये मदत करू शकते.
गर्भधारणेचे पोषण: गर्भधारणेदरम्यान खजूर खाण्याची शिफारस केली जाते कारण त्यात फोलेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे आईचे आरोग्य चांगले होते.
हाडांचे आरोग्य: खजूरमध्ये बोरॉन हे खनिज असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. खजूरांच्या नियमित सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारू शकते, विशेषत: महिलांचे वय वाढत असताना.
केसांचे आरोग्य: खजूरमध्ये भरपूर लोह असते, ज्यामुळे टाळूला रक्तपुरवठा होतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. यामुळे केसं सुद्धा मजबूत होतात.
त्वचेचे आरोग्य: खजूरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे सी आणि डी असतात, जे कोलेजनची वाढ आणि मऊपणा वाढवतात, ज्यामुळे त्वचा अधिक चांगली होते.