
फोटो सौजन्य - Social Media
रोटरी क्लब ऑफ मुंबई नोवा आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ तर्फे यूई लाइफसायन्सेसच्या सहकार्याने “रोटरी सर्विस डे” या विशेष उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या एकदिवसीय मोहिमेत कुलाबा ते बोईसर आणि व्हीटी ते मुलुंडपर्यंत पसरलेल्या ३० ठिकाणी शिरोटरी क्लब ऑफ मुंबई नोवा आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ तर्फे यूई लाइफसायन्सेसच्या सहकार्याने “रोटरी सर्विस डे” अंतर्गत महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
बिरे घेण्यात आली, ज्यामधून १,००० महिलांची नॉन-इन्वेसिव्ह तपासणी करण्यात आली.
या तपासण्यांसाठी यूई लाइफसायन्सेसच्या एआय-समर्थित iBreastExam या आधुनिक वैद्यकीय उपकरणाचा वापर करण्यात आला. हे पोर्टेबल, वेदनारहित आणि रॅडिएशन-मुक्त उपकरण स्तनाच्या ऊतींमधील सूक्ष्म बदल ओळखून कर्करोगाचे लवकर निदान करण्यात मदत करते. या तंत्रज्ञानामुळे महिलांना जलद, सोयीस्कर आणि अचूक तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर डॉ. मनिष मोटवानी यांनी सांगितले की, रोटरी सर्विस डे हा सर्वांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या रोटरीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. या ३० शिबिरांद्वारे महिलांना प्रतिबंधात्मक स्कॅन सुविधा देण्यात आल्या असून, त्यांच्या आरोग्य व कल्याणाबाबत जागरूकता आणि स्वनियंत्रण वाढवण्यावर भर देण्यात आला. यूई लाइफसायन्सेससोबतच्या सहयोगातून नावीन्य आणि भागीदारींच्या माध्यमातून समुदायावर अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणण्याच्या रोटरीच्या कटिबद्धतेचा प्रत्यय या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आला. तर यूई लाइफसायन्सेसच्या सीईओ गौरी नवलकर गोडसे म्हणाल्या, ”आम्हाला या देशव्यापी उपक्रमासाठी रोटरीसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो. रोटरीची तळागाळापासून पोहोच आणि आमचे एआय-समर्थित डिवाईस एकत्र करत आम्ही सामुदायिक आरोग्यामध्ये बदल घडवून आणण्याकरिता तंत्रज्ञान व आत्मीयतेसह एकत्र करता येणाऱ्या कामाच्या पद्धतीसाठी मॉडेल तयार करत आहोत.”
हा उपक्रम सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडला. मुंबईतील सांताक्रूझमधील एसडब्ल्यूईएस स्कूल, आयआयटी पवई, माहिम, वडाळा, विक्रोळी आदी ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित ऑपरेटर्स आणि रोटरी स्वयंसेवकांनी सरासरी ४० ते ५० महिलांची तपासणी केली. या उपक्रमातून रोटरीचं ‘Service Above Self’ हे ध्येय पुन्हा अधोरेखित झालं, जे समुदायाच्या आरोग्यसंवर्धनासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरलं.